By  
on  

माधुरी दीक्षित आता चाहत्यांना ऐकवणार ‘बेडटाईम स्टोरीज’

या लॉकडाऊनमध्ये धकधक गर्ल माधुरी सोशल मिडियावर अ‍ॅक्टीव आहे. ती चाहत्यांशी अनेक बाबी शेअर करत असते.  अभिनय, नृत्य यातून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी माधुरी आता आणखी माध्यमातून समोर येत आहे. माधुरीने आता एक व्हिडियो शेअर केला आहे. यामध्ये ती म्हणते, ‘ कधी कधी आपल्याला झोप लागत नाही उगाच अस्वस्थ वाटत असतं.

 

 

अशा वेळी कोणीतरी गोष्टी सांगाव्यात असं आवर्जुन वाटत राहतं. मी तुमच्यासाठी अशाच बेडटाईम स्टोरीज घेऊन आले आहे. धनी झोनच्या माध्यमातून तुम्ही या गोष्टी ऐकू शकाल’. आता माधुरीचा मधाळ आवाज झोपतानाही कानावर पडणार असल्याने चाहते खुश असतील यात शंका नाही.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive