By  
on  

अबब ! प्रभाससोबत सिनेमा करण्यासाठी दीपिकाने घेतलं इतकं मानधन ?

दीपिका आणि प्रभासची केमिस्ट्री आता चाहत्यांना मोठ्या पडद्यावर पाहता येणार आहे. हा बिग बजेट सिनेमा असल्याचं बोललं जात आहे. विजयंती मुव्हिजकडून या सिनेमाची निर्मिती केली जाणार आहे. प्रभास आणि दीपिका पहिल्यांदाच एकत्र झळकणार आहेत. सध्या या सिनेमाची चर्चा जोरात आहे. यानुसार दीपिकाने या सिनेमासाठी 20 कोटी रुपये मानधन घेतल्याची चर्चा सुरु आहे.

 

हे सत्य असेल तर दीपिका इतकं मानधन घेणारी पहिली अभिनेत्री बनेल. या सिनेमासाठी प्रभासला 50 कोटी तर तर दीपिकाला 20 कोटी दिले जाणार आहेत. या सिनेमाबाबत अश्विन नाग म्हणतात, ‘दीपिकाने आतापर्यंतसाकारलेल्या भूमिकांपेक्षा ही भूमिका वेगळी आहे. मला विश्वास आहे की दीपिका आणि प्रभासची जोडी सगळ्यांनाच आवडेल.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive