By  
on  

मिलिंद सोमण म्हणतो, मी वेटर किंवा कुक झालो असतो तर....

शुटींगच्या व्यस्त शेड्युलमधुन वेळ काढत फिटनेसबाबतीत जागरुक असणा-या कलाकारांमध्ये अभिनेता मिलिंद सोमणकडे पाहीले जाते. मॉडेलिंगच्या विश्वात मिलिंदने स्वत:चं असं खास स्थान निर्माण केलं आहे.  #throwbackthursday या हॅशटॅगखाली त्याने एक आठवण शेअर केली आहे. तो म्हणतो, ‘ माझी पहिली मॉडेलिंग असाईनमेंट 1989 ला मिळाली.

 

 

मला काही फोटोंसाठी 50,000 इतकी रक्कम देण्यात आली होती. इतकी रक्कम पाहून मी थक्क झालो. मी त्यावेळी 23 वर्षांचा होतो. एका हॉटेलमध्ये काम करता करता असा विचार करायचो की मी वेटर किंवा कुक म्हणून करीअरला सुरुवात केली असती तर मला असं काम करायला आवडलं असतं.’  यासोबतच त्याने त्यावेळचा एक फोटोही चाहत्यांशी शेअर केला आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive