By  
on  

कपिल शर्मा शो ने प्रेक्षकांना दिली घरबसल्या शोचा भाग होण्याची संधी, वाचा सविस्तर

ब-याच कालावधीनंतर ‘द कपिल शर्मा’ शो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या मालिकेत कलाकार पुन्हा त्याच उमेदीने भेटत आहेत. पण या शोचा अविभाज्य भाग असलेला सेटवर उपस्थित असलेला प्रेक्षकवर्ग मात्र लॉकडाऊनमुळे स्टुडियोमध्ये येऊ शकत नाही. 

 

 

पण लॉकडाऊनमध्येही या शोचा भाग होता येणं शक्य आहे. कपिल शर्माने याबाबतचा व्हिडियो शेअर करून माहिती दिली आहे. या शोमध्ये सहभागी होण्यासाठी     प्रेक्षकांना एक 10 ते 15 सेकंदाचा व्हिडियो बनवायचा आहे. त्यात नाव, शहर,वय आणि प्रोफेशनबाबतची माहिती द्यायची आहे. नंतर हा व्हिडियो सोशल मिडियावर पोस्ट करून कपिल शर्माला टॅग करावं लागेल. शो ची टीम संपर्क साधून व्हिडियो कॉलद्वारे तुम्ही ऑनएअर दिसाल. शोमध्ये धमाल तीच असली तरी फॉर्मेट बदलला आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive