Dil Bechara Movie Review: आयुष्य मनमोकळं जगायला शिकवतो सुशांत सिंह राजपूतचा शेवटचा सिनेमा ‘दिल बेचारा’

By  
on  

फिल्म: दिल बेचारा 
OTT: डिस्नी  +हॉटस्टार 
कास्ट: सुशांत सिंह राजपूत, संजना संघी, सैफ अली खान, स्वस्तिका मुखर्जी, साहिल वैद, सास्वता चटर्जी, सुमित टंडन 
दिग्दर्शक: मुकेश छाबड़ा 
 
जन्म कधी घ्यायचा आणि मरायचं कधी हे आपण ठरवू नाही शकत मात्र कसं जगायचय हे आपण ठरवू शकतो हा आहे सुशांत सिंह राजपूतचा शेवटचा सिनेमा ‘दिल बेचारा’ मधील हा डायलॉक प्रेक्षकांना कायम लक्षात राहील. कास्टिंग डिरेक्टर मुकेश छाबडा यांनी या सिनेमातून दिग्दर्शनात डेब्यू केलं आहे. जॉन ग्रीन यांच्या पुस्तकावर आधारित 2012मध्ये आलेल्या ‘फॉल्ट इन अवर स्टार्स’ या हॉलिवुड सिनेमाचा हा ऑफिशियल हिंदी रिमेक आहे.
कॅन्सरसारख्या आजाराने ग्रस्त असलेली किझी जिचं आयुष्य वेगळं आहे. ती देखील इतर मुलींप्रमाणे तिच्या स्वप्नातल्या राजकुमाराच्या प्रतिक्षेत आहे जिला सामान्य आयुष्य जगायचय.
सिनेमाची कथा किझी बासु (संजना संघी) पासून सुरु होते जी जमशेदपुरमधील एका कॉलेजमध्ये शिकतेय मात्र जिवन जगण्याची आशा तिने सोडलीय. कारण ऑक्सिजन सिलेंडरचं वजन आणि औषधं तिला सतत तिच्याकडे कमी आयुष्य असल्याची जाणीव करुन देतात. अभिनेत्री स्वस्तिका मुखर्जी आणि सास्वता चॅटर्जी तिच्या आई-वडिलांच्या भूमिकेत आहेत. किझीची एक इच्छा आहे ती म्हणजे तिला तिच्या आवडत्या म्युजिशियन अभिमन्यू वीरला भेटायचय. मात्र यातच तिच्या आयुष्यात एन्ट्री होते ती मॅनीची म्हणजेच इमॅन्युल राजकुमार जुनियर जो साकारलाय अभिनेता सुशांत सिंह राजपूतने. मॅनीहा हाडाचा कॅन्सर आहे ज्याच्यामुळे त्याच्या पायाची सर्जरी झाली आहे. मात्र हाच मॅनी किझीच्या आयुष्यात आनंद घेऊन येतो. आणि लवकरच मॅनीची भेट तिचा आवडता म्युझीशियन अभिमन्यू वीरसोबत करून देतो. ‘मै तुम्हारा’ या अभिमन्यूच्या अर्धवट राहिलेल्या गाण्याच्या शोध किझी करत असते आणि त्याचसाठी मॅनी तिला मदत करतो.
किझीचं हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मॅनी तिला पॅरिसला घेऊन जातो. मात्र त्यानंतर गोष्टी बदलतात. अभिमन्यूचं विचित्र वागणं किझीला खटकतं. मात्र सोबत मॅनीचा आधार असल्याने किझी सावरते. त्यानंतर ज्या गोष्टी घडतात त्या कथेला भावुक वळणावर घेऊन जातात.


दिग्दर्शक मुकेश छाबडा यांनी या सिनेमात ही भावुक कथा उत्तम पद्धतीने मांडली आहे. अगदी ‘फॉल्ट इन अवर स्टार्स’ सारखं नाही मात्र त्यातही कुठे कमी न पडल्याचही पाहायला मिळतं. काही गोष्टी आणि सीन या हॉलिवुड सिनेमाप्रमाणे जसेच्या तसे पाहायला मिळतात. मात्र काही ठिकाणी कंठ दाटून येईल असा हा सिनेमा आहे.‘दिल खुश हो जाता है उसके आने से’ किझीचा हा डायलॉग सुशांतच्या प्रत्येक एन्ट्रीमध्ये ज्यापद्धतीने तो येतो, वागतो, बोलतो त्यात जाणवतं. त्याला असं हसताना आणि हसवताना पाहुन छान वाटतं. तो एका ताऱ्यासारखा प्रत्येक सीनमध्ये चमकतोय. तो तुम्हाला हसवतो, नाचायला लावतो आणि रडवतोही. 
संजना ही किझीच्या भूमिकेत उत्तम बसलेली दिसतेय सुशांतसोबतचे तिचे सीन्सही छान खुलले आहेत. स्वस्तिका आणि सास्वता यांनी किझीच्या आई-वडिलांची भूमिका सुंदर पद्धतीन पार पाडली आहे. मॅनीच्या मित्राच्या भूमिकेत दाखवलेला साहील वैदही यात भाव खाऊन जातो. त्याचा अभिनयही उत्तम वाटतोय. अभिनेता सैफ अली खानचा या कॅमियो आहे. त्याचा काही मिनीटांचा रोलही प्रभावी आहे. 


ए. आर. रहमान यांचं जादुई संगीत या सिनेमाला लाभलं आहे. त्यामुळे सिनेमातील गाणी प्रचंड भावणारी आहे. ‘मै तुम्हारा’ (ह्दय गट्टानी-जोनीता गांधी), ‘मस्करी’ (ह्दय गट्टानी-सुनिधी चौहान)या सिनेमात योग्य वेळी येतात. तर इतरही गाणी सिनेमाच्या कथेला हळुवारपणे पुढे नेतात. अमित भट्टाचार्यने लिहीलेली ही गाणी उत्तम झाली आहेत.सेतू यांनी कॅमेऱ्यात कैद केलेलं पॅरिस आणि जमशेदपुर त्या ठिकाणची वैशिष्टे आणि सुंदरता दाखवतं. एडिटर आरिफ शेखमुळे हा सिनेमा स्वच्छ आणि सुंदर दिसतो. हा सिनेमा आयुष्य मनमोकळं जगण्याची आशा देतं. मात्र काही सीन्स हे थोडे नाटकी वाटतात. सुशांत आणि संजनाचा परफॉर्मन्स, सिनेमाची गाणी सिनेमाला खुलवतात. 
सुशांतसारख्या प्रतिभावान, हुशार आणि मेहनती अभिनेत्याच्या प्रवासाचं सेलिब्रेशन करायचं असेल आणि त्याला श्रद्धांजली द्यायची असेल तर हा सिनेमा पाहण्यापेक्षा जास्त अजून काय असू शकतं ? 
सेरी, सुशांत... 


 

Recommended

Loading...
Share