By  
on  

दाक्षिणात्य अभिनेत्री विजयलक्ष्मीचा आत्महत्येचा प्रयत्न, आत्महत्येपूर्वी शेअर केला व्हिडीओ

दाक्षिणात्य  अभिनेत्री विजयलक्ष्मीने आत्महत्याचे प्रयत्न केला आहे. विजयलक्ष्मीला रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं आहे. आत्महत्येचा प्रयत्न करण्यापूर्वी विजयालक्ष्मीने आपल्या सोशल मिडीयावरुन  एक व्हिडिओ पोस्ट केला होता. त्यामुळे या प्रकरणाची कलाविश्वात प्रचंड खळबळ माजली आहे. 

रविवारी विजयालक्ष्मीने  एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये ती ब्लड प्रेशरची औषध खातं आहे. या औषधांमुळे तिचं ब्लड प्रेशर कमी होऊन तिचा मृत्यू होईल, असं तिला जाणवत  आहे. 

सध्या तिच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. तिने फेसबुकवर एक व्हिडिओ पोस्ट केला. ज्यामध्ये तिने म्हटलंय, हा माझा शेवटचा व्हिडिओ आहे. गेल्या चार महिन्यांपासून मी सीमान आणि त्यांच्या पार्टीत असलेल्या लोकांमुळे खूप तणाग्रस्त आहे. मी माझ्या कुटुंबासाठी जगण्याचा प्रयत्न केला. पण मला ते शक्य होत नाही. मला हरी नादरने मीडियासमोर खूप अपमानित केलं आहे. मी ब्लड प्रेशरची औषधं घेतली आहेत व काही वेळातच माझा मृत्यू होईल.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive