By  
on  

राष्ट्रीय पुरस्कार विजेते संगीतकार एस मोहिंदर यांचं निधन, लता मंगेशकर यांनी व्यक्त केलं दु:ख

सहा सप्टेंबरला राष्ट्रीय पुरस्कार विजेते संगीतकार एस मोहिंदर यांचं निधन झालं. त्यांचं हृदयविकारच्या धक्क्याने निधन झालं. मोहिंदर यांना पंजाबी सिनेमा 'नानक नाम जहाज है (1969) साठी सर्वश्रेष्ठ संगीत दिग्दर्शनासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. भारतरत्न लतादीदींनी त्यांच्या निधनावर दु:ख व्यक्त केलं आहे. 

 

 

आपल्या ट्वीटमध्ये त्या म्हणतात, ‘मोहिंदर खुपच मनमिळावू आणि स्वच्छ मनाचे होते. त्यांच्या मृत्यूने मला दु:ख झालं आहे’.  यावेळी त्यांची लेक नरेन चोप्रा यांनी आठवण ताजी केली. ‘मोहिंदर यांचं करिअर ‘सेहरा’ सिनेमाने सुरु झालं. मधुबाला आणि राज कपूर यांचा मोहिंदर यांच्यावर विशेष जीव होता. दहेज हा त्यांचा शेवटचा सिनेमा होता.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive