By  
on  

लतादीदींनी अशा दिल्या मीना मंगेशकर यांना शुभेच्छा

मंगेशकर भावंड म्हणजे स्वरसागरच. या भावंडातील शेंडेफळ म्हणजे मीना मंगेशकर. आज मीना यांचा वाढदिवस आहे. मीना यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधत लतादीदींनी त्यांच्यसोबतचा फोटो शेअर करत शुभेच्छा दिल्या आहेत. आपल्या पोस्टमध्ये लतादीदी  म्हणतात, ‘ नमस्कार आज माझी छोटी बहीण मीना खडीकरचा वाढदिवस आहे. ती खुप उत्तम गायिका आणि उत्तम संगीतकारही आहे. तिला उदंड आयुष्य मिळो अशी कामना मी करते. 

 

 

काही दिवसांपुर्वीच लता दीदी यांचं प्रभूकुंज अपार्टमेंट करोना पेशंट सापडल्याने सील केलं गेलं होतं. लता मंगेशकर यांच्या सोसायटीमध्ये करोनाचे पाच रुग्ण सापडले. त्यानंतर ही इमारत सील केली गेली. या इमारतीमध्ये लता दीदींसह हृदयनाथ मंगेशकर आणि बहीण उषा मंगेशकर राहतात. 

Recommended

PeepingMoon Exclusive