By  
on  

पुनम पांडेने केली गोवा पोलिसात पती सॅम बाँबे विरोधात तक्रार, सॅम बाँबे अटकेत

बोल्ड अभिनेत्री पुनम पांडेच वैवाहिक आयुष्य सुरु होण्यापुर्वीच धोक्यात येताना दिसत आहे. या 10 सप्टेंबरला बॉयफ्रेंड सॅम बाँबेसोबत लग्नाच्या बेडीत अडकली होती. पण त्यानंतर काहीच दिवसात तिच्या पतीला गोवा पोलिसांनी अटक केली आहे. पुनमने पतीवर मॉलेस्टेशन आणि असॉल्टचा आरोप केला आहे. 

 

सोमवारी पुनमने पोलिसात तक्रार केली आहे की, नव-याने तिला मारहाण केली आणि गंभीर परिणाम भोगण्याची धमकी दिली. आता पुनमच्या पतीला पोलिसांनी अटक केली आहे. तिच्या मेडिकलनंतर त्याला कोर्टात दाखल केलं जाईल. सॅमला 354 ए, 323, 324 आणि 506 (2) या कलमांखाली अटक केली आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive