पुनम पांडेने पहिल्यांदाच समोर आणलं पती सॅम बॉम्बेपासून फारकत घेण्याचं कारण

By  
on  

आपल्या बोल्डनेससाठी विख्यात असलेली अभिनेत्री पुनम पांडेने साखरपुडा आणि लग्नाचे फोटो चाहत्यांशी शेअर करत आश्चर्याचा धक्का दिला होता. पण लग्नाला अवघे 15 दिवस झाले असतानाच पुनम पांडेच वैवाहिक आयुष्य सुरु होण्यापुर्वीच धोक्यात येताना दिसत आहे.

पुनमने पतीवर मॉलेस्टेशन आणि असॉल्टचा आरोप केला आहे. त्यामुळे तिच्या पतीला गोवा पोलिसांनी अटक केली. या प्रकरणात पहिल्यांदाच पुनम उघडपणे बोलली आहे. पुनम म्हणते, ‘सॅममध्ये आणि माझ्यात काही कारणास्तव वाद झाल्याने त्याने मला जोरात मारलं. त्यानंतर चेह-यावरही मारलं. माझ्यावर चाकूनेही वार केले. कशीबशी हॉटेलमधून बाहेर पडल्यावर हॉटेल स्टाफने पोलिसांना बोलावलं. त्यानंतर मी त्याच्या विरोधात तक्रार दाखल केली.  या नात्यामधे मला अनेकदा हॉस्पिटलमध्येही जावं लागलं आहे. पण सगळं ठीक होईल या आशेवरच मी लग्नाचा निर्णय घेतला होता. पण आता मी या नात्यात राहू इच्छित नाही. ‘

Recommended

Loading...
Share