एक गुणी अभिनेत्री म्हणून मृण्मयी देशपांडेला आपण सर्वच ओळखतो. नाटक, मालिका आणि सिनेमे अशा सर्वच माध्यमांतून मृण्मयीने आपल्या अभिनयाचा ठसा उमटवलाय. पण तिने एक गुणी दिग्दर्शिका असल्याचंसुध्दा 'मन फकीरा' या सिनेमातून सिध्द केलं आहे. आजच्या तरुणाईचा नात्यांचा झालेला गुंता तिने या सिनेमाद्वारे अलवार उलगडण्याचा यशस्वी प्रयत्न करत रसिकांची मनं जिंकली.
'कुंकू', 'अग्निहोत्र' या मालिकेतून मृण्मयी घराघरात पोहचली.
'मोकळा श्वास', 'नटसम्राट', 'शिकारी', कट्यार काळजात घुसली, बोगदा, 'फर्जंद', 'फत्तेशिकस्त', मिस यू मिस्टर या चित्रपटातून तिने रसिक प्रेक्षकांची मनं जिंकली.
तर अनुराग या सिनेमातून मृण्मयी प्रथमच अभिनेत्रीसोबतच त्या सिनेमाची प्रस्तुतकर्ती म्हणून प्रेक्षकांसमोर आली.
महत्त्वाचं म्हणजे बॉलिवूडची धकधक गर्ल माधुरी दीक्षितच्या १५ ऑगस्ट या नेटफ्लिक्सवर भेटीला आलेल्या सिनेमांतही मृण्मयीने लक्षवेधी भूमिका साकारली.
मृण्मयी देशपांडे दिग्दर्शित 'मन फकीरा' सिनेेमा रसिक प्रेक्षकांना खुप भावला. समिक्षकांकडूनही त्याचं बरंच कौतुक झालं.
लवकरच मृण्मयीने दिग्दर्शित केलेला आगामी सिनेमा मनाचे श्लोक प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
दिग्दर्शन हे मृण्मयीचं पहिलं प्रेम आहे.
मित्रा या समलैंगिंक संबंधावर आधारित सिनेमातील मृण्मयीच्या अभिनयाचं खुप कौतुक झालं.