By  
on  

बॉलिवूडमध्ये गरजतोय स्त्री शक्तीचा नारा, ‘वुमन्स डे’ ला या सिनेमांची आठवण जरूर काढाच !

आज सर्वत्र महिला दिनाचा माहोल आहे. सगळीकडे वुमन्स डेचं जोरदार सेलिब्रेशन सुरु आहे. बॉलिवूडच्या यशात महिला प्रधान सिनेमांनीही महत्त्वपूर्ण योगदान दिलं आहे. अस्मितेसाठी हातात नांगर घेणा-या मदर इंडियातील नर्गिसपासून ते देशासाठी हातात गन घेणा-या राजी मधल्या सहमतवर रसिकांनी भरभरून प्रेम केलं आहे. बॉलिवूडच्या आभाळापेक्षाही उंच अशा स्त्री व्यक्तिरेखा पुढील प्रमाणे

सहमत (राजी) :

हा सिनेमातील देशासाठी प्राणाची बाजी लावणारी जिगरबाज सहमत आपल्या प्रत्येकाच्या मनाला स्पर्श करून जाते. आलिया भटचा अभिनय केवळ लाजवाब म्हणावा असा.

मीनल (पिंक) :

‘नो मीन्स नो’ हा लहान आणि महत्त्वपूर्ण संदेश देणारा हा सिनेमा शेवटपर्यंत मनाची पकड घेतो. शेवट मात्र प्रेक्षकाला अंतर्मुख करतो.

राणी लक्ष्मीबाई ( मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांसी) :

स्वातंत्र्यलढ्यातील तेजस्वी नाव म्हणजे राणी लक्ष्मीबाई. स्वराज्यासाठी प्राणार्पण करणा-या या वीरांगनेची व्यक्तिरेखा कंगनाने पडद्यावर उत्तम निभावली आहे.

देवकी ( मॉम ) :

आई प्रसंगी आपल्या पिल्लासाठी काय काय करू शकते याचं उत्तम उदाहरण म्हणजे हा सिनेमा. हा सिनेमा बॉलिवूडची पहिली सुपरस्टार श्रीदेवी यांचा देखील अखेरचा सिनेमा होता.

नीरजा (नीरजा) :

स्वत:पेक्षा प्रवाशांचा जीव महत्त्वाचा समजून प्राणांची बाजी लावणारी एअर होस्टेस नीरजा भानोत हिची कथा या सिनेमात आहे. जिगरबाज नीरजाची व्यक्तिरेखा सोनम कपूरने साकारली होती.

 

Recommended

PeepingMoon Exclusive