By  
on  

Birthday Special: अजय गोगावले यांची टॉप 5 गाणी

आपल्या दमदार आवाजाने मराठी सिनेसृष्टी गाजवण्याबरोबरच हिंदीतही आपल्या झेंडा रोवणारे अजय-अतुल ही गायक-संगीतकार जोडी प्रेक्षकांच्या प्रचंड आवडीची आहे. अनेक मालिका आणि नाटकांच्या संगीताची जबाबदारीसुध्दा ते लिलया पार पडतात. ‘सैराट’ या सुपरहिट सिनेमाच्या यशात संगीताचा फार मोठा वाटा होता आणि ही धुरा अजय यांनी अतुल यांच्या साथीने सहज पेलली. अनेक मानाच्या पार्श्वगायन आणि संगीत दिग्दर्शनाच्या पुरस्कारांवर अजय-अतुल यांनी आपली मोहोर उमटवली आहे. त्यांच्या म्युझिक कॉन्सर्टची तर रसिक आतुरतेने वाट पाहात असतात. वाढदिवसानिमित्त अजय गोगावले यांनी पार्श्वगायन व संगीत दिग्दर्शन केलेली दमदार टॉप 5 गाणी खास पिपींगमून डॉट कॉमवर  

अग्नीपथ या बॉलिवूड सिनेमाला दिलेल्या दमदार संगीतामुळे अजयजींची ही सर्वच गाणी सुपरहिट ठरली.  

सैराट सिनेमाला अजय-अतुल यांनी सदाबहार संगीत दिल्याने सर्वच गाणी हद्याला भिडली. याड लागलं.....हे गाणं आपल्या मातीतलं आणि आपलंसं वाटतं.  

सैराटच्या झिंगाटबद्दल काय बोलावं, या गाण्याचं जितकं कौतुक करु तितकंच कमी आहे. या गाम्याचं विशेष म्हणजे गायन, संगीत दिग्दर्शन आणि गीतलेखन ही सर्वच जबाबदारी अजय-अतुल यांनी सांभाळली. झिंगाट गाणं लागल्यावर कोणीही कधीही ताल धरून थिरकू लागतो. मराठीसोबतच बॉलिवूडलाही या गाण्याने झिंगाट केलं   

जाऊ द्या ना बाळासाहेब या सिनेमातील  बेबी ब्रिंग इट ऑन या हटके गाण्याला प्रेक्षकांची प्रचंड पसंती मिळाली.   

 नटरंग सिनेमातील अजयजींच्या आवाजात स्वरबध्द झालेलं खेळ मांडला.. गाणं  ऐकताना काळजाचा ठोका चुकतो.   आपल्या सुमधूर कारकिर्दीने सिनेसृष्टी गाजवणारे अजय गोगावले यांना पिपींगमून मराठीतर्फे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

Author

Recommended

PeepingMoon Exclusive