By  
on  

Diwali 2021: दिवाळीतील फराळासारख्या तिखट-गोड आहेत मालिकांमधील लाडक्या नायिका

आनंद आणि जल्लोषाचा, उत्साहाचा सण म्हणजे दिवाळी. झगमगत्या दिव्यांच्या या सणाची लहान-मोठे वर्षभर चातकासारखी वाट पाहतात. म्हणूनच दिवाळीला सणांचा राजा म्हणतात. दिवाळी म्हटलं की, नवीन कपडे, रोषणाई फटाके हे आलेच परंतु फराळाशिवाय दिवाळी हे समीकरण जुळतच नाही. काहीसा गोड, काहीसा तिखट व बराचसा खुसखुशीत ठेवा म्हणजे फराळ!

दिवाळीत घरोघरी फराळाचा घमघमाट सुटतो. आई, आजी, काकू, मावशी, बहिण, आत्या, वहिनी सा-याच जणी फराळासाठी एकत्र जमतात. हल्ली तर अनेक पुरुष मंडळी फराळ तयार करण्यात मोठा पुढाकार घेतात. थोडक्यात काय तर फराळाशिवाय दिवाळी वाटतच नाही. मालिकांमधील आपल्या या लाडक्या नायिकासुध्दा दिवाळीतल्या तिखट गोड- फराळासारख्या आहेत. चला तर पाहूया, कोण काय आहे..

 

 

बेसनचा लाडू – स्विटू  ( येऊ कशी तशी मी नांदायला)

येऊ कशी तशी मी नांदायला मालिकेतील गोड लाघवी स्विटू नावाप्रमाणेच आहे. बेसनाच्या लाडवासारखी तुपातला गोडवा तिच्यात उतरला आहे.

 

करंजी – अरुंधती  (आई कुठे काय करते ) 

 

 

संपूर्ण कुटुंबाला एकत्र बांधून ठेवणारी अरुंधती म्हणजेच आई कुठे काय करतेमधील आई. ती अगदी करंजीप्रमाइेच आहे. प्रेमळ, गोड आणि वेळप्रसंगी करंजीच्या बाहेरील आवरणाप्रमाणेच खुसखुशीत आणि कणखर बनणारी

 

चकली – मालविका (येऊ कशी तशी मी नांदायला)

 

 

येऊ कशी तशी मी नांदायला मधील मालविका म्हणजे फराळातील हुकुमी एक्का चकलीसारखी आहे. ती चकलीसारखीच तिखट, खमंग, डोळ्यांतून पाणी आणायला भाग पाडणारी आणि आपल्या कटकारस्थानांमध्ये गोल गोल गुंतणारी. 

 

शंकरपाळी - नेहा (माझी तुझी रेशीमगाठ)

 

माझी तुझी रेशीम गाठ ही मालिका अल्पावधितच रसिकांच्या गळ्यातला ताईत बनलीय. श्रेयस तळपदे आणि प्रार्थना बेहरे ही जोडी प्रेक्षकांना खुप भावतेय. या मालिकेतील प्रार्थना म्हणजेच नेहा कामत ही शंकरपाळीसारखी गोड, खुसखुशीत आणि खमंग आहे. प्रसंगी तिच्यात कणखर आणि कठोर असे शंकरपा्ळीच्या कडकडीत गुणांसारखे गुण दिसून येतात. 

 

चिवडा – अंतरा (जीव माझा गुंतला)

 

हमसफर चालवणारी जीव माझा गुंतलाची अंतरा ही चिवड्याप्रमाणेच सर्वांना आपल्यात व हमसफरमध्ये सामावून घेते. चिवड्यात जसे अनेक जिन्नस एकत्र येतात. तसेच अंतरा सर्वांना आपल्या तिखट-गोड स्वभावाने बांधून ठेवते. 

 

तिखट शेव – शालिनी ( सुख म्हणजे नक्की काय असतं.)

 

शा लि नी हे म्हणजे सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेतील भारी प्रकरणं . सर्वांनीच आपल्या तालावर नाचावं असंच शालिनी वहिनींना वाटतं. पण त्या तिखट शेवेसारख्या आहेत. त्यांना सतत मान हवा असतो. मग तो त्या कसाही घेतात. त्या तिखट शेवेसारख्या ताठ आणि कडक आहे. 

 

रव्याचा लाडू -  लतिका  (सुंदरा मनामध्ये भरली )

 

रव्याच्या लाडवा सारखी गोल आणि गोड अशी  छान तुपातली आपली लाडकी सुंदरा मनात भरलीची नायिका लतिका आहे. जिभेवर ठेवताच वितळणा-या रव्याच्या लाडवासारखी लतिका आपल्या मायेने माणसांना जोडून ठेवते आणि सर्वांवरच भरभरून प्रेम करते. 

 

अनारसे -  मुक्ता बर्वे  ( अजूनही बरसात आहे )

 

 

अजूनही बरसात आहेची मीरा म्हणजे दिवाळीतला  खमंग खुसखुशीत पदार्थ अनारशांसारखी आहे. गोड आणि प्रसंगी बाहेरील आवरणासारखी कडक खुसखुशीत. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive