By  
on  

Peepingmoon year ender 2021 : या प्रसिध्द मराठी कलाकारांनी मालिकाविश्वात केलं दमदार कमबॅक

प्रार्थना  बेहरे 

हिंदी टेलिव्हिजनमधून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केलेली मराठमोळी अभिनेत्री म्हणजे प्रार्थना बेहरे. प्रार्थनाने चक्क ११ वर्षांनी झी मराठीवरील 'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेतून मराठी टेलिव्हिजनवर पदार्पण केलं. मराठी सिनेमांमधला हा प्रसिध्द चेहरा टेलिव्हिजनच्या माध्यमातून दररोज प्रेक्षकांच्या भेटीला येत असल्याने तिच्या चाहत्यांना खुप आनंद होतोय. 

 

अंकुश चौधरी

सुपरस्टार अंकुश चौधरी तब्बल १५ वर्षांनंतर टेलिव्हिजनवर दमदार एण्ट्री घेतली. बेधुंद मनाच्या लहरी या झी मराठीवर कॉलेज लाईपवर धारित मालिकेत तो झळकला होता. डान्स रिएलिटी शोच्या परीक्षकपदी अंकुश विराजमान झाला होता.  'मी होणार सुपरस्टार' या डान्स रिअलिटी शोमध्ये अंकुशने सुपर जजची भूमिका पार पाडली.  

 

ह्रता दुर्गुळे

ह्रताला छोट्या पडद्याने खरी ओळख मिळवून दिली. तिच्या दुर्वा आणि फुलपाखरु या मालिका प्रचंड लोकप्रिय ठरल्या. आता नाटक आणि सिनेमांमध्ये रमलेल्या ह्रताने बर-याच कालावधीनंतर छोट्या पडद्यावर कमबॅक केलं .  'मन उडु उडु झालं या हटके लव्ह्स्टोरी असलेल्या मालिकेत दिपू ही नायिका साकारत ह्रता पुन्हा रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवतेय.

 


विजय कदम

गूढ, रहस्य आणि थरारकतेने भरलेल्या  'ती परत आलीये' या मालिकेने अल्पावधितच रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. अलिकडेच या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला. मर्यादित भागांच्या या मालिकेतील बाबूराव या पात्राने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं. बाबूरावची व्यक्तिरेखा साकारणारे ज्येष्ठ कलाकार म्हणजे विजय कदम. दूरदर्शनवर मालिकांकमधून महत्त्वपूर्ण भूमिकांमध्ये झळकणारे विजय कदम ब-याच वर्षानीं छोट्या पडद्याकडे वळले. 

 

अजिंक्य देव 

लोकप्रिय अभिनेते अजिंक्य देव यांनी  छोट्या पडद्यावर कमबॅक केलं .  'जय भवानी जय शिवाजी' या ऐतिहासिक मालिकेत अजिंक्य देव यांनी  बाजीप्रभू देशपांडे यांची भूमिका साकारली.  स्वराज्यासाठी जीवाची बाजी लावणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिलेदारांची शौर्यगाथा या मालिकेत उलगडली. 
 

भूषण प्रधान

स्टार प्रवाह वाहिनीवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या शूर मावळ्यांची आणि त्यांच्या साथीदारांची शौर्यगाथा पाहायला मिळाली. नेताजी पालकर, बाजीप्रभू देशपांडे, शिवा काशिद, जीवा महाला, तान्हाजी मालुसरे, कान्होजी जेधे,हंबीरराव मोहिते, कोंढाजी फर्जंद या शूरवीरांची नावं आपल्याला परिचित आहेत. 'जय भवानी जय शिवाजी' ही मालिका या लवढय्यांच्या शौर्याला अर्पण होती. अलिकडेच या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला. अभिनेता भुषण प्रधान या मालिकेत छत्रपती शिवरायांची भूमिकेत पाहायला मिळाला. पिंजरा मालिकेतला नायक साकारतल्यानंतर तब्बल 10 वर्षांनी भूषणने छोट्या पडद्यावर कमबॅक केलं. 

 

मुक्ता बर्वे 

'अजून ही बरसात आहे' ही मालिका सध्या चर्चेत आहे. या मालिकेत अभिनेत्री मुक्ता बर्वे 'मिरा'ची भूमिका साकारत आहे. 'मुंबई-पुणे-मुंबई', 'डबल सीट', 'जोगवा' या आणि अशा अनेक दर्जेदार चित्रपटांद्वारे, सहजसुंदर अभिनयामुळे मुक्ता बर्वे महाराष्ट्राच्या घराघरांत पोहचली. एका लग्नाची गोष्ट या मालिकेनंतर ब-याच वर्षांनी मुक्ताने टेलिव्हिजनवर कमबॅक केलं. 

 

 

श्रेयस तळपदे 

मराठमोळा अभिनेता श्रेयस तळपदेने मराठी सिनेसृष्टीतच नव्हे तर बॉलिवूडमध्ये देखील आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची पसंती मिळवली आहे. श्रेयसने आजवर विविध भूमिका साकारत प्रेक्षकांचं मनोरंजन केलंय. छोट्या पडद्यावरुन आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात करणाऱ्या श्रेयसने बॉलिवूडच्या रुपेरी पड्यावरदेखील मोठं यश मिळवलं. मात्र आता एका मोठ्या ब्रेकनंतर श्रेयस तळपदेने 'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेतून छोट्या पडद्यावर कमबॅक केलं. लाघवी यशच्या भूमिकेतून तो प्रेक्षकांची मनं जिंकतोय. 

 

उमेश कामत

 'अजूनही बरसात आहे' या मालिकेत. अभिनेता उमेश कामत 'आदिराज'ची भूमिका साकारत आहे. त्याची आणि मुक्ता बर्वेची जोडी प्रेक्षकांना खुप भावतेय. झी मराठीवरील असंभव, एका लग्नाची तिसरी गोष्ट या लोकप्रिय मालिकांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर उमेशने छोट्या पडद्यावर कमबॅक केलं आहे. 

 

संजय नार्वेकर 

मराठी नाटक, सिनेमा एवढचं नाही तर हिंदी सिनेमातही अभिनेते संजय नार्वेकर यांनी प्रेक्षकांची मोठी पसंती मिळवली आहे. 'अगं बाई अरेच्या' मधील त्यांची धमाल असो किंवा 'वास्तव' मधील देडफुट्या प्रेक्षकांनी संजय यांच्या प्रत्येक भूमिकेला भरभरून प्रेम दिलंय. मात्र बऱ्याच काळानंतर आता हे लोकप्रिय अभिनेते मालिकाविश्तातून प्रेक्षकांच्या भेटीला आले . स्टार प्रवाहवरील 'तुझ्या इश्काचा नादखुळा' या मालिकेतून ते महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकले.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive