PeepingMoon year ender 2021: यावर्षी या कलाकारांनी थाटला संसार 

By  
on  

2021 हे वर्ष काहींसाठी खास ठरलं ते या कारणासाठी की मराठी मनोरंजन विश्वातील अनेक कलाकारांन त्यांचा संसार थाटला. अनेक अभिनेते, अभिनेत्रींचा विवाह यावर्षी संपन्न झाला. यातील काही कलाकारांची लग्ने मोठ्या प्रमाणात चर्चेत राहिली.
अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर ही जोडी तर सोशल मिडीयावरही चर्चेत असेत. कोरोनाग्रस्त परिस्थितीत लॉकडाऊनमुळे दोघांचं लग्न 2020 मध्ये न होता 2021मध्ये पार पडलं. 7 जानेवारी रोजी पुण्यात पेशवाई थाटात सिद्धार्थ आणि मितालीचा विवाहसोहळा संपन्न झाला होता. यावेळी मनोरंजन विश्वातील अनेक कलाकारही उपस्थित होते.

2020 मध्ये अभिनेत्री मानसी नाईकने ती प्रेमात असल्याचं सांगत बॉयफ्रेंड प्रदीप खरेरासोबतच्या नात्याचा खुलासा केला. 20 जानेवारी 2021 रोजी मानसी आणि प्रदीपचा विवाह संपन्न झाला. या लग्नातील मानसीचा जोधा अकबर मधील ऐश्वर्यासारखा केलेला लुक चर्चेत राहिला.

अभिनेत्री अभिज्ञा भावेचं लग्न यावर्षी चर्चेत होतं. वर्षाच्या सुरुवातीलाच 6 जानेवारी रोजी अभिज्ञाने बॉयफ्रेंड मेहुल पैसोबत लगीनगाठ बांधली. मेहुल हा व्यावसायिक आहे तर अभिज्ञा ही मराठी आणि हिंदी मालिकांमधील लोकप्रिय अभिनेत्री आहे.

अप्सरा म्हणून प्रसिद्ध असलेली लोकप्रिय अभिनेत्री सोनाली कुलकर्णीनेही याचवर्षी लगीनगाठ बांधली. बॉयफ्रेंड कुणाल बनोडेकरसोबत दुबईत अतिशय साध्या पद्धतिने दोघांनी लग्न केलं. यावेळी काही ठरावीक नातेवाईक मित्रमंडळींच्या उपस्थित हे लग्न पार पडलं. 7 मे रोजी विवाहबंधनात अडकून सोनाली मिसेस बेनोडेकर झाली. 

अभिनेता आस्ताद काळे आणि अभिनेत्री स्वप्नाली पाटील हे गेल्या काही वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. यावर्षी फेब्रुवारी महिन्यात आस्ताद आणि स्वप्नाली यांनी लगीनगाठ बांधली. कोरोनाचा धोका लक्षात घेता दोघांनी कोर्ट मॅरेज पद्धतिने लग्न केलं.

अभिनेत्री रुचिता जाधव देखील याच वर्षी लग्नबंधनात अडकली. 3 मे रोजी आनंद माने याच्यासोबत तिचा विवाहसोहळा संपन्न झाला. आनंद हा मुंबईतील एक व्यावसायिक आहे.

अभिनेता सुयश टिळक आणि अभिनेत्री आयुषी भावे यांच्या नात्याचा खुलासा याचवर्षी झाला. दोघांनी सोशल मिडीयावर पोस्ट करुन साखरपुडा झाल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर 21 ऑक्टोबर रोजी हे गोड कपल विवाहबंधनात अडकले. 

कुसुम मालिका फेम अभिनेत्री वेदांगी कुलकर्णी आणि अभिषेक तिळगुळकर यांचही लग्न याचवर्षी पार पडलं. याचवर्षी साखरपुडा करून दोघांनी नव्या नात्याला सुरुवात केली. तर 20 नोव्हेंबरला दोघांनी लगीनगाठ बांधली.


 ‘लग्नाची वाईफ वेडिंगची बायकू’ या मालिकेत काजल आणि मदनची भूमिका साकारणारे कलाकार विजय आंदळकर आणि रुपाली झनकार यांनीदेखील याचवर्षी डिंसेबरमध्ये लग्न केलं.

दख्खनचा राजा ज्योतिबा या मालिकेत चोपडाईची भूमिका साकारलेली अभिनेत्री सई कल्याणकर देखील याचवर्षी विवाहबंधनात अडकली आहे. वर्षा अखेरीस प्रशांत चव्हाणसोबत सई विवाहबद्ध झाली.

Recommended

Loading...
Share