PeepingMoon year ender 2021: मराठी सिनेविश्वातील हे कलाकार झाले आई-बाबा

By  
on  

2021 हे वर्ष यंदा अनेक मराठी सेलिब्रिटींसाठी खास होतं. कारण यंदा त्यांच्या आयुष्याचा एक नवा अध्याय सुरु झाला. घरी आलेल्या गोड चिमुकल्यांमुळे ते आनंदून गेले आहेत. आई-बाबा म्हणून ख-या आयुष्यातली भूमिकासुध्दा आपले लाडके सेलिब्रिटी खुप चोख बजावतायत. शुटींग, बिझी शेड्यू यांमधूनसुध्दा आपल्या चिमुकल्यांमुळे घराकडे परतण्याची त्यांची ओढ वाढतेय. चला तर मग पाहूया, 2021 मध्ये कोणत्या सेलिब्रिटींच्या घरी चिमुकल्यांचं आगमन झालंय. 

 

अंकित मोहन-रुची सावरान 

अभिनेता अंकित मोहनच्या घरी नुकतंच एका नव्या पाहुण्याचे आगमन झाले आहे. त्याची पत्नी अभिनेत्री रुची सवर्ण हिने एका गोड मुलाला जन्म दिला आहे. अंकितने सोशल मीडियावर पोस्ट करत याबाबतची माहिती दिली. बाळ आणि पत्नी रुचीसोबतचे फोटो शेअर करत त्यांनी ही आनंदाची बातमी चाहत्यांना दिली . अनेक सेलिब्रिटींनी कमेंट करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

 

उर्मिला निंबाळकर 

युट्युबर, अभिनेत्री उर्मिला निंबाळकरने अलीकडेच आई बनल्याची गोड बातमी चाहत्यांशी शेअर केली होती. उर्मिलाने गोंडस मुलाला जन्म दिला आहे. उर्मिला बाळासोबतचे फोटो , व्हिडीओ सतत शेयर करते. चाहत्या व्हिडीओंना खुप पसंती देतात. 

 

शशांक केतकर 

मराठी मालिकाविश्वातला लोकप्रिय अभिनेता शशांक केतकर आणि त्याची पत्नी प्रियांका केतकर यांनी काही महिन्यांपूर्वीच आपण आई-बाबा झाल्याची गोड बातमी चाहत्यांना दिली होती. हे दोघंही एका गोंडस मुलाचे आई-बाबा झाले आहेत. ऋग्वेद असं त्यांच्या चिमुकल्याचं नाव आहे. 

 

स्मिता तांबे 

जोगवा, ७२ माईल्स, देऊळ यांसारख्या मराठी सिनेमातून आपल्या सशक्त अभिनयाची छाप पाडणारी अभिनेत्री म्हणजे स्मिता तांबे . स्मिता तांबेचं डोहाळेजेवण तिच्या मैत्रीणींनी उत्साहात साजरं केलं होतं. तो व्हिडीओ बराच व्हायरल झाला होता. काही महिन्यांपूर्वीच स्मिताच्या घरी लक्ष्मीचं आगमन झालं. स्मिता आणि विरेंद्र द्विदेवी यांचे २०१९ मध्ये लग्न झाले आहे.  कन्यारत्नाचा लाभ झाल्याने दोघंही पती-पत्नी खुप खुश आहेत. 

 

आरोह वेलणकर 

मराठी सिनेमे आणि मालिकांमधून प्रेक्षकांचा लाडका ठरलेला अभिनेता आरोह वेलणकर काही महिन्यांपूर्वीच बाबा झाला आहे. आरोहची पत्नी अंकिताने गोंडस मुलाला जन्म दिला. अर्जून वेलणकर असं त्याच्या मुलाचं नाव आहे.सोशल मिडीयावर आरोहने अर्जूनसोबतचा गोड फोटो शेअर केल्यावर चाहत्यांनी त्याच्यावर लाईक्सचा वर्षाव केला. 

संकर्षण कऱ्हाडे

मराठमोळा अभिनेता संकर्षण कऱ्हाडे बाबा झाला आहे. संकर्षणच्या पत्नीने जुळ्या बाळांना जन्म दिला आहे. 27 जून रोजी या दोन्ही बाळांचा जन्म झाला आहे. संकर्षणने ही गोड बातमी सोशल मीडियावर शेअर केली आहे. महत्वाचं म्हणजे या दोघांची नावं देखील त्याने शेअर केली आहे. संकर्षणने मुलाचं नाव 'सर्वज्ञ' आणि 'स्रग्वी' असं मुलीचं नाव ठेवलं आहे. या दोन्ही नावाची सोशल मीडियावर चर्चा आहे. 

 

सावनी रविंद्र

आपल्या सुरेल आवाजाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारी गायिका 'सावनी रविंद्र' हिला ६७ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार' सोहळ्यात बार्डो या मराठी सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका म्हणून नुकतंच सन्मानित करण्यात आलं. गायिका सावनी रविंद्र आणि तिचे पती डॉ. आशिष धांडे यांना ऑगस्ट महिन्यात कन्यारत्नाचा लाभ झाला. त्यांनी गोंडस लेकीचं नाव शार्वी असं ठेवलंय. 

 

निपुण धर्माधिकारी 

मराठी कलाविश्वातील अभिनेता दिग्दर्शक निपुण धर्माधिकारी नुकताच बाबा झाला आहे. यंदा जानेवारीमध्ये त्यांच्या घरी चिमुकलीचं आगमन झालं. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्याने ही माहिती दिली आहे. निपुणच्या पत्नीने एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे.निपुण धर्माधिकारी हे नाव मराठी कलाविश्वातील लोकप्रिय व्यक्तींपैकी एक आहे. भाडिपा म्हणजेच भारतीय डिजिटल पार्टीमुळे तो विशेष प्रकाशझोतात आला. 

 

समीर परांजपे

सुंदरा मनामध्ये भरली ह्या कलर्स मराठीवरील लोकप्रिय मालिकेमुळे प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा अभ्या फेम अभिनेता समीर परांजपे यंदा बाबा झाला. त्याची पत्नी अनुजाने गोंडस चिमुकलीला जन्म दिला.जानेवारी महिन्यात आपल्याला कन्यारत्नाचा लाभ झाल्याचे समीरने सोशल मि़डीयावरुन चाहत्यांना सांगितले होते. 

अक्षय वाघमारे 

बिग बॉस मराठी सीझन ३ मध्ये यंदा स्वॅगमारे म्हणून अभिनेता अक्षयची बरीच चर्चा झाली. अभिनेता म्हणून आधीमफर्जंद आणि आता पावनखिंड हा ऐतिहासिक सिनेमा भेटीला येतोय. अक्षय आणि त्याची पत्नी अक्षय आणि योगिता यांना दोघांना ७ मे रोजी कन्यारत्नाचा लाभ झाला. अक्षय व योगिताने त्यांच्या मुलीचे नाव ‘अर्णा’ ठेवले आहे.

 


खुशबू तावडे - संग्राम साळवी

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय जोडी खुशबू तावडे आणि संग्राम साळवी यांना कन्यारत्नाचा लाभ झाला. खुशबूने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली. खुशबूने आपल्या मुलाच्या जन्माची बातमी देताना त्याचे नावही चाहत्यांना सांगितले आहे. खुशबूने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरून बाळाच्या हाताचा फोटो शेअर करत नावाचा खुलासा केला आहे. राघव असं त्यांच्या चिमुकल्याचं नामकरण त्यांनी केलं आहे.

Recommended

Loading...
Share