मराठी राजभाषा दिन 2022 : मराठी भाषेचे गोडवे गाणारी प्रसिध्द गाणी, अभिमानाने ऊर येईल दाटून 

By  
on  

ज्येष्ठ कवी वि.वा.शिरवाडकर म्हणेच सर्वांचे लाडके   कुसुमाग्रज यांचा 27 फेब्रुवारी हा जन्मदिवस ‘मराठी भाषा गौरव दिन’ म्हणून साजरा केला जातो.  मराठी भाषेची गौरवशाली परंपरा जपण्यासाठी आणि तिचे संवर्धन करण्यासाठी मराठी भाषा दिन संपूर्ण महाराष्ट्रात उत्साहात साजरा केला जातो.
27  फेब्रुवारी हा जागतिक मराठी भाषा दिवस, मराठी भाषा दिन, मराठी भाषा गौरव दिन अशा नावाने साजरा केला जातो. साहित्य अकादमी, पद्‍मभूषण, ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त ज्येष्ठ साहित्यिक वि.वा शिरवाडकर म्हणजेच कुसुमाग्रजांच्या स्मृतीप्रित्यर्थ हा राजभाषा दिन साजरा होतो. येणा-या नव्या पिढीलासुध्दा मातृभाषेची गोडी लागावी, महत्त्व कळावं म्हणूनच ही खास गाणी पाहूयात..

लाभले आम्हांस भाग्य बोलतो मराठी.... 

मराठी भाषेचं अभिमान गीत म्हणून लाभले आम्हांस भाग्य बोलतो मराठी... हे गाणं तमाम महाराष्ट्राचा अभिमान आहे. संगीतकार कौशल इनामदार यांनी संगीतबध्द केलेल्या या गाण्यात कलाविश्वातील अनेक दिग्गज गायकांनी आपल्या सुरेल स्वरांनी या गाण्याला स्वरबध्द केंलं आहे.

 महाराष्ट्रभूमी ही जन्मभूमी ..अतिवंदनीय ही...अति प्राणप्रिय ही मायमराठी आमुची 

आपली जन्मभूमी महाराष्ट्रभूमीबद्दल लहान-थोर प्रत्येकालाच खुप मोठा आदर आणि अभिमान आहे. अतिवंदनीय ही...अति प्राणप्रिय ही मायमराठी आमुची हे मराठीचे गोडवे गाताना सारेच तल्लिन होतात. प्रसिध्द पार्श्वगायक रोहित राऊतने सारेगमप लिटील चॅम्प्सच्या मंचावर जेव्हा हे मराठी अभिमान गीत सादर केलं, तेव्हा प्रेक्षकांसह परिक्षकांचाही ऊर अभिमानाने भरुन आला. 

माझे  नमन मायमराठीला

माझं नमन माय मराठीला, आपल्या बोलीला,मानतो तिला जीव की प्राण असे ही नवरत्नांची खाण,असे ही रत्नहिऱ्यांची खाण… हा पोवाडा जेव्हा सादर केला जातो तेव्हा  ऐकणा-या प्रत्येक मराठी माणसाचा उर अभिमानाने दाटून येतो. 

महाराष्ट्र देशा

मिथिला पालकर आणि गंधार या तरुणाईच्या सुरेल स्वरांनी सजलेलं महाराष्ट्राच्या मातीत रुजलेल्या मराठीजनांची गाथा या गाण्यात आहे. 

 

मराठी पाऊल पडते पुढे |

मराठा तितुका मेळवावा या कृष्णधवल काळातील लोकप्रिय सिनेमातील मराठी पाऊल पडते पुढे हे गाणं आजही तितक्याच गौरवानं म्टलं जातं. आनंदघन यांच संगीत असलेलं हे गीत हदयनाथ मंगेशकर, लता मंगेशकर व उषा मंगेशकर यांनी स्वरबध्द केलं. 

Recommended

Loading...
Share