भारताची गानकोकिळा लता मंगेशकर आज 28 सप्टेंबर 2019 रोजी 90 व्या वर्षात पदार्पण करत आहेत. लता दीदींचा हा वाढदिवस म्हणूनच खास आहे. 28 सप्टेंबर 1929 साली लतादिदींचा जन्म इंदौर येथे झाला. आज त्यांचा 89 वा वाढदिवस आहे. आपल्या सुरेल आवाजाने अनेक दशकांपासून श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणा-या लतादीदी आजही गायन श्रेत्रात तितक्याच सक्रिय असतात. फारच लहान वयापासून लतादिदींनी गायनाला सुरुवात केली.
वडिल पंडित दिनानाथ मंगेशकर यांच्याकडून त्यांनी गायनाचे धडे गिरवले. लतादीदी या उषा, आशा, मीना, हदयनाथ या सर्व भावंडात मोठ्या आहेत. त्यामुळे लहानपणापासूनच त्यांनी आपल्या भावंडांची काळजी घेण्यापासून त्यांच्यावर गायनाचे संस्कार केले.लतादीदींनी हिंदी तसेच मराठीमध्ये स्वतःच्या गायनाने चार दशकं गाजवली. लतादीदींची ही मराठी गाणी आजही ऐकली की आपले कां तृप्त होतात. जाणून घेऊया अशाच काही गाण्यांबद्दल
१) मी रात टाकली
'जैत रे जैत' सिनेमातलं अभिनेत्री स्मिता पाटीलवर चित्रित झालेलं लता मंगेशकर यांनी गायलेलं 'मी रात टाकली' हे गाणं आजही लोकप्रिय आहे
२) ऐरणीच्या देवा तुला
'साधी माणसं' सिनेमातलं 'ऐरणीच्या देवा तुला' हे गाणं जयश्री गडकर यांच्यावर चित्रित झालं आहे. लतादीदींनी स्वतःच्या स्वरसाजाने या गाण्याला वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवलं.
३) लेक लाडकी या घरची
राजा गोसावी, उषा किरण आणि सूर्यकांत यांच्या १९६० साली असलेल्या 'कन्यादान' सिनेमात 'लेक लाडकी या घरची' या लडिवाळ गाण्याला लतादीदींनी स्वतःच्या स्वरांनी सजवले होते.
४) चाफा बोलेना
'मधुघाट' अल्बम मधील 'चाफा बोलेना' हे लता मंगेशकरांनी गायलेलं गाणं आजही सर्वांच्या आवडीचं आहे.
५) बाई बाई मनमोराचा
'मोहित्यांची मंजुळा' सिनेमातील 'बाई बाई मनमोराचा कसा पिसारा फुलला' या गाणं आणि त्या गाण्याला लतादीदींनी दिलेल्या आवाजामुळे हे गाणं आजही रसिकांच्या ओठांवर आहे.
याचबरोबर लतादीदींनी गणपतीची अनेक गाणी तसेच संताच्या अभंगांना स्वतःच्या गाण्याने स्वरसाज चढवला आहे.