पाहा बालदिन स्पेशल: मराठीतील हे सिनेमे तुमच्या बालपणीच्या आठवणींना देतील उजाळा

By  
on  

14 नोव्हेंबर हा पंडित जवाहरलाल नेहरुंचा वाढदिवस बालदिन म्हणूनही साजरा केला जातो. लहान मुलांची मुर्ती भलेही लहान असो, पण अनेकदा त्यांच्या हुशारीने ते मोठ्यांनाही आश्चर्याने तोंडात बोटं घालायला लावतात. अर्थात मराठी सिनेमेही याला अपवाद नाही. लहान मुलांच्या अभिनयाने सजलेले हे मराठी सिनेमे तुम्हालाही तुमच्या बालपणाची आठवण नक्कीच देतील. 

शाळा

शाळा आणि तिच्या आठवणी प्रत्येकाच्या मनाच्या अगदी जवळ असतात. त्यामुळेच सुजय डहाके दिग्दर्शित या सिनेमा या यादीत टॉपवर आहे. 

चिंटू

आपल्यापैकी सगळ्यांनीच चिंटूला कार्टूनच्या रुपात पाहिलं आहे पसंतही केलं आहे. हाच चिंटू सिनेमाच्या रुपात भेटायला आला तेव्हा सगळ्यात जास्त भावला. शुभंकर अत्रेनेही ही भूमिका अत्यंत उत्तम साकारली होती. 

नाळ

अगदी अलीकडेच रिलीज झालेला हा सिनेमा थेट भावनेला हात घालतो. लहान मुलांच्या भावविश्वाची सफर या सिनेमाच्या निमित्ताने आपल्या प्रत्येकालाच हळवं करून सोडते. 

पोरबाजार: 


लहान मुलांच्या निरागसतेचा फायदा अनेकदा समाजातील वाईट घटकांकडून घेतला जातो. त्यातूनच चाईल्ड ट्रॅफिकिंगसारखा भयानक गुन्हा जन्मास येतो. याच गुन्ह्यावर भाष्य करणारा हा सिनेमा आहे. 

एलिझाबेथ एकदशी: 


 

लहान मुल जेव्हा मोठ्या माणसांसारखी वागतात त्यावेळी येणारी धमाल या सिनेमात दिसून येते. या सिनेमातील भावंडांची हटके केमिस्ट्री मनाला स्पर्शून जाते. 

किल्ला: 


 

एखाद्या ठिकाणाहून जाऊन दुस‌-या ठिकाणी रुजणं मोठ्या माणसांनाही जड जातं तर त्याला लहान मुलं कशी अपवाद असतील. किल्लामधील अर्चित देवधरलाही हे जुळवून घेणं अवघड जातं. त्याचा हाच प्रवास किल्लामधून आपल्या समोर येत आहे. 

 खारी बिस्कीट: 


 

भाऊ बहिणीची निरागस केमिस्ट्री प्रत्येकालाच आवडते. त्यातून एखादं भावंड आजारी असेल तर त्याची विशेष काळजी घेतली जाते. खारी बिस्कीटमध्ये नेमकं हेच दाखवून दिलं आहे. या स्पेशल बाँडिंगवर हा सिनेमा बेतला आहे. 

बाबा

प्रेमाला भाषेची, आवाजाची गरज नसते. असते ती फक्त संवेदना. मुलं लहान असो किंवा मोठी वडिलांशी त्यांचं भावविश्व कायमच जोडलेलं असतं. मुलगा आणि वडिल यांच्या नात्यावर आधारलेला हा सिनेमा मनाला स्पर्शून जातो.

पक पक पकाक: 

एक खोडकर मुलगा त्याच्या खोड्यांनी एकाचं आयुष्य कसं सुंदर बनवतो हे या सिनेमात दाखवलं आहे. यात सक्षम कुलकर्णी आणि नाना पाटेकर यांची केमिस्ट्री उत्तम जमून आली आहे.

Recommended

Loading...
Share