अमृता खानविलकर हे नाव जरी डोळ्यासमोर आलं तरी उत्तम नृत्य आणि अदकारीची झलक डोळ्यासमोर येते. गोलमाल सिनेमापासून सुरु झालेला प्रवास आज तिला एका वेगळ्याच उंचीवर घेऊन गेला आहे.
साडेमाडे तीन मधली सालस आणि ग्लॅमरस अशी भूमिका तिने उत्तम साकारली. अमृताची प्रेक्षकांसमोर खरी ओळख झाली ती वाजले की बारा या गाण्यामुळे या गाण्यातील तिची अदाकारी, नृत्य या सगळ्यावर प्रेक्षक फिदा झाले. त्यानंतर तिने अजिबात मागे वळून पाहिलं नाही.
अर्जुन, फक्त लढ म्हणा, शाळा, सतरंगी रे, वेलकम जिंदगी या सिनेमांनी अभिनेत्री म्हणून तिला एक एक पायरी वर नेलं. कट्यार काळजात घुसलीमधली जरीना साकारताना तिने उत्तम अभिनय कौशल्याची चुणुक दाखवली.
या दरम्यान एक मोठा सिनेमा तिच्या वाट्याला आला तो म्हणजे राझी. राझीमधील मुनीरा बेगमची व्यक्तिरेखा तिने उत्तम साकारली. ही भूमिका उत्तम वठवण्यासाठी तिने उर्दू भाषेचं शिक्षणही घेतलं. त्या भाषेतील उच्चार, लहेजा हे प्रयत्नपुर्वक आत्मसात केलं. या तिने वेबविश्वातही पदार्पण केलं.
‘डॅमेज्ड’ या वेबसिरीजमधून अमृता प्रेक्षकांच्या समोर आली. यानंतर डॉ. काशिनाथ घाणेकरमध्ये संध्या या अभिनेत्रीला पडद्यावर साकारण्याचं आव्हान तिने पेललं. सिनेमांशिवाय अमृताने रिअॅलिटी शो ची जज म्हणूनही काम पाहिलं आहे. तर खतरों के खिलाडी या स्टंट्बाजीच्या रिएलिटी शोमध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती.
तर पती हिमांशूसोबत नच बलिये या हिंदी रिअॅलिटी शोची विनरही झाली आहे. अमृताच्या वाढदिवसानिमित्त आणि उत्तरोत्तर अशीच प्रगती करण्यासाठी पीपिंगमून मराठीकडून तिला खुप शुभेच्छा....