माधुरी दीक्षित नेने हे भारतीय सिनेसृष्टीतलं असं नाव आहे जे तब्बल तीन दशकं रसिकांवर आपली मोहिनी घालते आहे. अभिनय आणि नृत्याविष्कार असा दुहेरी संगम साधत ही धक धक गर्ल प्रेक्षकांवर आजही तितकीच भुरळ पाडते. आज 15 मे हा या सौंदर्यसम्राज्ञीचा वाढदिवस. माधुरीने आपल्या बॉलिवूड कारकिर्दीची सुरुवात 1984 मध्ये 'अबोध' या सिनेमातून केली.व
'अबोध'नंतर मग तिने कधीच मागे वळून पाहिलं नाही.अनेक लहान-मोठ्या भूमिका साकारत ती सतत पुढे जात राहिली, प्रत्येक अपयशातून शिकत आपल्या मेहनत आणि अभियाच्या जोरावर तिने स्वत:चं स्थान निर्माण केलं.
माधुरीच्या नावावर अनेक सुपरहिट सिनेमे आहेत. अभिनेत्यांबरोबर खांद्याला खांदा लावून आपल्या अभिनयाची ताकद दाखवून देणा-या अभिनेत्रींमध्ये ती अग्रस्थानी आहे.‘राम लखन’, ‘त्रिदेव’, ‘परींदा’ ‘दिल’,’सैलाब’, ‘थानेदार’, ‘100 डेज’ ‘साजन’, ‘जमाईराजा’, ‘बेटा’, ‘खलनायक’, अंजाम, राजा, याराना, कोयला, मोहब्बत, हम आपके हैं कौन?, दिल तो पागल है, वजुद, पुकार, गजगामिनी, लज्जा, देवदास
माधुरीने अलिकडेच प्रदर्शित झालेल्या कलंक आणि टोटल धम्माल या सिनेमांमधून पुन्हा आपल्या सदाबहार अभिनयाची जादू दाखवून दिली.
90 च्या दशकांत माधुरी आपल्या सिनेकारकिर्दीच्या यशोशिखरावर पोहचली होती. चालून आलेल्या प्रत्येक संधीचं म्हणजेच सिनेमाचं आपल्या नृत्य आणि अभिनयाने सोनं करायची.
एकेकाळी म्हणजेच माधुरी 90 च्या दशतकांत प्रसिध्दी शिखरावर असताना तिचं नाव अभिनेता संजय दत्त याच्यासोबत जोडलं गेलं. त्यांच्या प्रेमप्रकरणाच्या चर्चा त्याकाळी चवीचवीनं चघळल्या जायच्या. पण 1993 मुंबई बॉम्बस्फोटांदरम्यान अवैध शस्त्रास्त्र बाळगल्यामुळे संजय दत्तला तुरुंगवास झाला आणि त्यानंतर हे प्रेमीयुगूल विभक्त झाले.
माधुरीने 1997 रोजी अचानक चंदेरी दुनियेशी कुठलाही संबंध नसलेल्या अमेरिकास्थित डॉक्टर श्रीराम नेने यांच्याशी लग्नगाठबांधली.
लग्नानंतर माधुरी पती डॉक्टर श्रीराम नेने यांच्यासह अमेरिकेतच स्थायिक झाली. तिथे त्यांचा सुखाचा संसार सुरु झाला. श्रीराम हे माधुरीला तिच्या सिनेकारकिर्दीसाठी नेहमीच खंबीर पाठींबा देताना पाहायला मिळतात.
माधुरीला अरिन आणि रेआन ही दोन गोड मुलंसुध्दा आहेत. हे दोघंही आता टीनएजर झाले आहेत.
सौंदर्य आणि अदाकारी याचा सुंदर मिलाफ साधणा-या माधुरीचा अभिनय आजही सर्वांना घायाळ करणाराच ठरतो.
मूळची मराठमोळी असलेल्या बॉलिवूडकर माधुरीला अखेर मराठी सिनेमात पदार्पण करण्याचा मोह आवरता आला नाही. 'बकेट लिस्ट' या सिनेमाद्वारे तिने 2018 साली मराठीत पदार्पण केलं.उतकंच नव्हे आता तर माधुरी मराठी सिनेमांची निर्मितीसुध्दा करतेय. तिची निर्मिती असलेलला १५ ऑगस्ट हा सिनेमा नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला होता. तर आगामी पंचक हा माठी सिनेमा लवकरच रसिकांच्या भेटीला येतोय.