नवरात्रीत नऊ दिवस नऊ रंगांची वस्त्रे परिधान करण्याची प्रथा सुरू आहे. एकाच रंगांची वस्त्रे परिधान केल्याने सगळ्या महिलांमध्ये एकता दिसते अशी या मागील धारणा आहे. नवरात्रीच्या दिवसांत नऊ रंगांना खुप महत्त्व प्राप्त होतं. दस-याच्या पुर्वेसंध्येला गुलाबी रंगाला महत्त्व आहे. यावेळी अभिनेत्रींचा गुलाबी अंदाज तुमचं मन मोहवून टाकेल.