तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरते आहे. या मालिकेतील कुटुंबिय पारंपरिक असल्यामुळे घरचं वातावरण देखील पारंपरिक आहे. विभक्त कुटुंब पद्धती फोफावत असताना पुन्हा एकत्र कुटुंबपद्धतीला नवसंजीवनी देणारी ही मालिका आहे.
या मालिकेत हार्दिक जोशी आणि अमृता पवार मुख्य भूमिकेत आहेत. या मालिकेत या दोघांची जोडी सगळ्यांना आवडते आहेच. पण या जोडीची ऑफस्क्रीन मैत्रीही चर्चेत आहे. ही जोडी सोशल मिडियावर चर्चेत असते. या जोडीला प्रेक्षकांचं प्रेम मिळताना दिसत आहे.