अभिनेत्री सोनाली खरे सोशल मिडियावर अॅक्टीव्ह असते. अनेकदा ती तिचे सुंदर फोटो फॅन्ससोबत शेअर करत असते. सोनालीने अलीकडेच एक व्हिडिओ शेअर केला आहे.
त्यात 22 October ला ती फॅन्ससाठी खास सरप्राईज आणणार असल्याचं नमूद केलं आहे. हे सरप्राईज काय असेल याबाबत तिचे फॅन्सही अनेक तर्क वितर्क लावताना दिसत आहे.
सोनाली फिटनेस फ्रीक आहे. ती अनेकदा तिचे योगा करतानाचे फोटो सोशल मिडियावर शेअर करत असते.
सोनालीच्या या सरप्राईजसाठी #wowwithsonali हा हॅशटॅगही ट्रेंड होताना दिसत आहे.
अभिनेता, दिग्दर्शक संजय जाधव यांनीही सोनालीला खास व्हिडिओ शेअर करून सोनालीला शुभेच्छा दिल्या आहेत.