By  
on  

शुभ्र परिराणी प्रार्थना बेहरेचे हे नवं फोटोशूट तुम्ही पाहिलंत का ?

सध्या लंडनमध्ये शूटींगसाठी व्यस्त असलेली सर्वांची अभिनेत्री प्रार्थना बेहरेने एक झक्कास फोटोशूट केलं आहे. पांढ-या शुभ्र गाऊनमधलं हे बोल्ड फोटोशूट पाहून तुम्हीसुध्दा घायाळ व्हाल हे नक्की. या नव्या लूकमध्ये ती जणू एखाद्या शुभ्र परिराणीसारखीच भासतेय. ती लवकरच वेबप्लॅटफॉर्मवरुनही प्रेक्षकांसमोर येतेय. 

 

 

 प्रार्थना बेहरेची प्रमुख भूमिका असलेला ती अॅण्ड ती हा सिनेमा अलीकडेच प्रेक्षकांच्या भेटीला आला होता.आता सर्वांनाच अभिनेत्री प्रार्थनाच्या आगामी प्रोजेक्टची उत्सुकता लागून राहिली आहे. 

 

 

मराठी सिनेसृष्टीतील सुंदर आणि चुलबली अभिनेत्री अशी प्रार्थना बेहरेची ओळख आहे. काही वर्षांपूर्वी एकामागून एक सिनेमांमधून झळकणारी प्रार्थना सध्या फार निवडक सिनेमांमधूनच प्रेक्षकांसमोर येतेय. ती दोन वर्षापूर्वीच अभिषेक जावकरसोबत लग्नबंधनात अडकली. अभिषेक दाक्षिणात्य सिनेमामंधील प्रसिध्द डिस्ट्रीब्युटर आहे. 

 

 

 

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive