By  
on  

वजन कमी झाल्यावर ही अभिनेत्री दिसते अशी, ओळखणंही झालं कठीण

रात्रीस खेळ चाले या मालिकेच्या पहिल्या भागावर रसिकांनी उदंड प्रेम केलं. या भागातील कलाकारांनाही रसिकांच्या प्रेमाचा अनुभव आला. या मालिकेतील वैशिष्ट्यपूर्ण व्यक्तिरेखा म्हणजे सुशल्या. अभिनेत्री ऋतुजा धर्माधिकारीने ही व्यक्तिरेखा साकारली होती.

 

या मालिकेनंतर ऋतुजा बिग बॉसमध्येही दिसली होती. पण दुखापतीनंतर मात्र तिला घराबाहेर पडावं लागलं होतं. पण ऋतुजाचा आता नवीन लूक समोर आला आहे.

 

 

सुशल्याच्या भूमिकेत काहीशी स्थुल वाटणारी ऋतुजा एकदम स्लीम आणि ट्रीम झाली आहे. ऋतुजाच्या या मेकओव्हरला चाहत्यांचा चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. रात्रीस खेळ चालेनंतर ऋतुजा ‘झोपाळा’ या शॉर्टफिल्ममध्ये दिसली होती.

 

 

 

ऋतुजाच्या आगामी प्रोजेक्टची तिचे फॅन्स नक्कीच वाट पहात असतील.

 

Recommended

PeepingMoon Exclusive