By  
on  

पाहा विक्की वेलिंगकरच्या ट्रेलर लॉंचचे Photos

विक्की वेलिंगकर’ हा सिनेमा ६ डिसेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत असून आत्तापर्यंत या सिनेमाचे पोस्टर, टीझर, गाण्याला प्रेक्षकांचा उत्कृष्ट असा प्रतिसाद मिळाला आहे. सौरभ वर्मा यांचे दिग्दर्शन असलेल्या ‘विक्की वेलिंगकर’मध्ये सोनाली कुलकर्णी मध्यवर्ती भूमिकेत दिसणार असून आता ती एकदम नव्या लूकमध्ये या चित्रपटात प्रेक्षकांसमोर येणार आहे.

 

नुकत्याच प्रदर्शित झालेल्या टीजरने प्रेक्षकांमध्ये या सिनेमाबद्दलची उत्कंठा अधिक ताणली गेली असतानाच नुकताच या सिनेमाचा ट्रेलर लाँच सोहळा मुंबईत सोनाली कुलकर्णी, स्पृहा जोशी, विनिता खरात, केतन सिंग, जुई पवार, गौरव मोरे, संग्राम समेळ, रमा जोशी, दिग्दर्शक सौरभ वर्मा आणि चित्रपटातील इतर कलाकारांच्या प्रमुख उपस्थितीत दिमाखात पार पडला. 

या सिनेमामध्ये विक्कीची भूमिका सोनाली कुलकर्णी हिने साकारली असून स्पृहा जोशीने विद्या, संग्राम समेळने हॅकर मित्राची तर रमा जोशी यांनी पबजी आजीची भूमिका साकारली आहे. त्याचबरोबर विनिता खरात, केतन सिंग, जुई पवार, गौरव मोरे यांच्यादेखील महत्त्वाच्या  भूमिका आहेत.

“विक्की वेलिंगकर’ ही कॉमिक पुस्तकातील व्यक्तिरेखा असून ती एक घड्याळ विक्रेता आहे. आयुष्यातील एका अनपेक्षित अशा गूढतेशी या व्यक्तिरेखेचा सामना होतो. आपल्या सर्व आव्हानांवर आणि अडचणींवर मात करत खंबीरपणे उभे राहणाऱ्या नायिकेची ही कथा आहे,” असे उद्गार चित्रपटाचे दिग्दर्शक सौरभ वर्मा यांनी काढले. त्यांनी यापूर्वी ‘मिकी व्हायरस’ आणि ‘७ अवर्स टू गो’ आदी चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. 

 

 

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive