By  
on  

पुन्हा एकदा ग्लॅमरस अवतारात दिसली 'मिसेस मुख्यमंत्री'ची सुमी , पाहा Photos

सुमी म्हणून घराघरांत पोहचलेली 'मिसेस मुख्यमंत्री' फेम अभिनेत्री अमृता धोंडगे ही अल्पावधितच लोकप्रिय झाली. गावरान भाषा, बिनधास्त व हटके अंदाज यामुळे ही सुमी सर्वांचीच लाडकी बनली. सुमी फेम अमृता धोंडगे ही प्रत्यक्ष आयुष्यातही तितकीच बिनधास्त आहे. ती नेहमीच सोशल मिडीयावर अॅक्टीव्ह असते व चाहत्यांच्या संपर्कात असते. सुमीचे विविध फोटोशूट सोशल मिडीयावर पाहायला मिळतात. 

मालिकेत साधी सरळ सुमी साकारणा-या अमृताचे विविध ग्लॅमरस फोटोशूट नेहमीच चर्चेत असतात. सध्या लॉकडाऊन काळात सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत सर्वचजण घरात आहोत, त्यामुळे अमृता या काळात स्वत:चे विविध ग्लॅमरस फोटो शेअर करतेय. तिच्या ह्या फोटोंवर चाहत्यांनी लाईक्स व कॉमेंट्सचा वर्षाव केला आहे. 

ऑफ शोल्डर ब्लॅक टॉपमध्ये अमृता खुप उठावदार दिसतेय. 

रेड वाईन रंगाच्या वेस्टर्न ड्रेसमध्ये अमृताच्या सौंदर्याला चार चॉंद लागले आहेत.

 सर्वांची जिरवून मिरवणारी सुमी म्हणजेच अभिनेत्री अमृता धोंडगे  मात्र प्रत्यक्ष आयुष्यात तितकीच बिनधास्त आहे. तिचे हे खास फोटो पाहून तुम्हाला लक्षात येईलच. 

 मराठी टीव्ही तसेच सिनेसृष्टीत अभिनयाची छाप उमटवणारी अमृता ही मुळची कोल्हापुरची असुन पुण्यात तिचा जन्म झाला. 

 

मिसेस मुख्यमंत्री मालिकेच्या आगामी भागांची रसिकांना उत्सुकता लागून राहिली  आहे.  

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive