स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेत छ्त्रपती संभाजी महाराज साकारणा-या अमोल कोल्हेंची जितकी प्रशंसा झाली तितकीच येसूबाई साकारणा-या प्राजक्ता गायकवाडचंही कौतुक झालं.
शालीन पण खंबीर येसूबाई प्राजक्ताने उत्तम साकारली आहे. संभाजी महाराजांसोबत तलवारबाजी, घोडेस्वारीही येसूबाईनी सहज केली.
पण हे सगळं करण्यासाठी लागणारी उर्जा प्राजक्ता जिमिंग करून मिळवते.
प्राजक्तालाही येसूबाई साकारण्यासाठी तलवारबाजी, लाठीकाठी आणि घोडेस्वारी शिकावी लागली.
प्राजक्ता अनेकदा जीममधील फोटो चाहत्यांशी शेअर करत असते.