‘ती सध्या काय करते’ या सिनेमातून अभिनय बेर्डेने सिनेसृष्टीत पाऊल ठेवले. पण तुम्हाला माहिती आहे का अभिनय इतकीच त्याची लहान बहीण स्वानंदीही स्टायलिश आहे.
स्वानंदीने नुकताच एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये तिचा साडीमधील घायाळ करणारा अंदाज दिसत आहे.
तिच्या या फोटोवर लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव होत आहे. स्वानंदी सोशल मीडियावर आई प्रिया बेर्डे यांच्यासोबतचेही फोटो पोस्ट करत असते.
तिचे हे लूक्स पाहता ती लवकरच सिनेसृष्टीत पदार्पण करण्याची शक्यता नाकारता येत नाही.