युवा डान्सिंग क्विनमधील गंगाची होत आहे चर्चा, कोण आहे गंगा ?

By  
on  

युवा डान्सिंग क्विन या डान्स रिएलिटी शोमध्ये सौंदर्यवतींचे एकापेक्षा एक डान्स परफॉर्मन्स पाहायला मिळतात. मात्र या शोमधील एक व्यक्ती सगळ्यांचे लक्ष वेधते, ती म्हणजे गंगा. या शोचा सुत्रसंचालक अद्वैत दादरकर त्याच्या विनोदी शैलीने शो आणखी मनोरंजक करतो तर त्याच्यासोबत गंगाचीही मस्ती पाहायला मिळते. 


प्रणीत हाटे असं या गंगाचं खरं नाव आहे. गंगा एक ट्रान्सजेंटर असून तिचे याआधीचे फोटो पाहून तुम्हाला विश्वास बसणार नाही की हाच प्रणीत आता गंगा म्हणून समोर आला आहे. युवा डान्सिंग क्विनच्या मंचाने गंगाला सगळ्यांसमोर येण्याची संधी दिली आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by pranit hate (Ganga) (@h_pranit) on

मात्र नुकत्याच झालेल्या एका एपिसोडमध्ये याच गंगासाठी खास नृत्य सादर करण्यात आलं. यावेळी गंगा भावुक झाली आणि तिने तिची जीवन कहाणी सगळ्यांसमोर बोलून दाखवली. यावेळी गंगा म्हटली की, “सगळे मला गंगाच्या नावाने ओळखतात. माझं मुळ नाव प्रणीत संदीप हाटे आहे, मला लहानपणापासून सगळे बायल्या म्हणायचे, मला एक कमेंट आली होती की तू फक्त साडी नेसून नाच, मग मी ठरवलं होय मी घालेन साडी, माझ्यात तेवढी हिंमत आहे. गंगा एक ट्रान्सजेंडर आहे. आणि गंगामुळेच प्रणीतला त्याचं खरं अस्तित्त्व मिळालं.”


युवा डान्सिंग क्विनच्या मंचावर या कार्यक्रमाचे परिक्षक, स्पर्धक यांची गंगासोबत चांगलीच मैत्री झाली आहे. 


 

Recommended

Loading...
Share