By  
on  

Movie Review: नवख्या कलाकारांची टवटवीत लव्हस्टोरी सांगणारा ‘अशी ही आशिकी’

प्रत्येक पिढीनंतर प्रेमाची परिभाषा बदलत जाते. नवीन पिढीची प्रेम व्यक्त करण्याची पद्धत बदलत असली तरी संकल्पनेत मात्र मुळीच बदल झालेला नाही. हेच दिसून येतं ‘अशी ही आशिकी’मध्ये. या सिनेमात स्वयम आणि अमरजा यांच्यातील लव्हस्टोरी दिसत आहे. पण ही स्टोरी वाटते तितकी सरळ नाही. प्रेमाच्या वाटेत येणारे अनेक चढ उतार पार करून अमरजा आणि स्वयमची लव्हस्टोरी यशस्वी होते का हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.

कलाकार : अभिनय बेर्डे, हेमल इंगळे, सुनील बर्वे

दिग्दर्शक : सचिन पिळगावकर

कालवधी : २ तास १० मिनिट

कथानक : ही गोष्ट स्वयम (अभिनय बेर्डे) आणि अमरजा (हेमल इंगळे) यांच्या लव्हस्टोरीची आहे. या कॉलेजगोईंग कपलच्या सततच्या एकत्र असण्याने, आवडी-निवडी जुळल्याने प्रेमाचे बंध निर्माण होतात. पण प्रत्येक लव्हस्टोरीप्रमाणेच या कथेतही ट्वीस्ट येतो. त्यामुळे या टीनएजर्सवर लवकर लग्न करण्याची वेळ येते. लग्नामुळे वेगळ्या वळणाला गेलेली कथा सिनेमाच्या शेवटीही ट्वीस्ट निर्माण करते. स्वयम आणि अमरजा यांच्या नात्यातील हे नवं कोडं उलगडतं की सिनेमाचा शेवट आणखी वेगळा करतं हे जाणून घ्यायचं असेल तर सिनेमा पहावा लागेल.

अभिनय : या सिनेमातून अभिनय आणि हेमल ही एकदम फ्रेश जोडी रसिकांसमोर आली आहे. अभिनयच्या तुलनेत हेमल नवखी असली तरी तिचं नवखेपण कुठंच जाणवून येत नाही. सिनेमातील प्रत्येक कलाकाराने वाट्याला आलेला अभिनय उत्तम साकारला आहे.

सिनेमा का पहावा? : अभिनय आणि हेमलचा फ्रेश अभिनय पहायचा असेल तर. याशिवाय स्वित्झर्लंडसारख्या देखण्या लोकेशन्सवर जाऊन केलेलं शुटिंग, एकुणच सिनेमाला असलेला फ्रेश लूक पहायचा असेल तर हा सिनेमा जरूर पहायला हवा.

Recommended

PeepingMoon Exclusive