By  
on  

‘नाय वरनभात लोन्चा कोण नाय कोन्चा’ Review : गिरणी कामगारांच्या कुटुंबाच्या वाताहतीची कथा

चित्रपट –  नाय वरनभात लोन्चा कोण नाय कोन्चा’ 

कलाकार – प्रेम धर्माधिकारी, वरद नागवेकर, छाया कदम, शशांक शेंडे, रोहित हळदीकर, कश्मिरा शाह, उमेश जगताप, गणेश यादव, अतुल काळे, अश्विनी कुलकर्णी, सविता मालपेकर, ईशा दिवेकर 

दिग्दर्शक –  महेश मांजरेकर 

रेटिंग –  2.5 मून्स

 

मराठी सिनेसृष्टीतील प्रसिध्द अभिनेते आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर यांचे सिनेमे नेहमीच चाकोरीबाहेरचे असतात. जगण्यातलं वास्तव पडद्यावर मांडण्याची आणि त्यातली पेटती धग सिनेरुपात उतरवण्यासाठी ते नेहमीच प्रयत्नशील राहतात.याचा अनुभव त्यांच्या आत्तापर्यंतच्या अनेक सिनेमांमधून आला आहे. असाच एक वास्तवदर्शी पण तितकाच सिनेमा घेऊन अभिनेते दिग्दर्शक महेश मांजरेकर रसिकांच्या भेटीला आले आहेत. ‘नाय वरनभात लोन्चा कोण नाय कोन्चा’ असं हटके नाव असलेल्या या सिनेमाची सुरुवातीपासूनच बरीच चर्चा झाली.
 

 काँक्रिटच्या जंगलातील उद्ध्वस्त अस्तित्व’ ही पोस्टरवरील टॅगलाईन दाहकतेची जाणीव करून देणारी आहे. विविध वयोगटातील उद्विग्न  चेहरे ‘नाय वरनभात लोन्चा कोण नाय कोन्चा’च्या पोस्टरवर पहायला मिळतायत. त्यातच ‘दम असेल तरच थिएटरात येऊन सिनेमा पाहा’’ ही टॅगलाईनसुध्दा सिनेमाविषयीची उत्सुकता ताणून धरते. 

 मुख्य म्हणजे या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित होताच नव्या वादालासुध्दा तोंड फुटलं. अनेकांनी यातील दृष्यांवर आरोप घेतल्याने हा सिनेमा वादाच्या भोव-यात अडकला होता. 
या सिनेमाची पार्श्वभूमी ही वास्तव आणि लालबाग परळ या महेश मांजरेकरांच्याच सिनेमासारखी आहे. फक्त या सिनेमात अल्पवयीन मुलांच्या गुन्हेगार बनण्याच्या प्रवासाभोवी कथानक गुंफण्यात आलं आहे.  दिवंगत ज्येष्ठ नाटककार, पत्रकार जयंत पवार यांनी लिहिलेल्या ‘वरन भात लोन्चा नि कोन नाय कोन्चा’ या कथेवर हा सिनेमा बेतला आहे.  सिनेमाची पटकथा आणि दिग्दर्शन अशी दुहेरी जबाबदारी महेश यांनी सांभाळली आहे. या सिनेमाच्या पोस्टरवर आपण जे निर्विकार चेहरे पाहतो तेच चेहरे या सिनेमातलं तीन पिढ्याचं प्रतिनिधित्व करतात. 

हा सिनेमा आपल्याला तीन दशक मागे घेऊन जातो. मुंबईत त्यावेळी झालेला गिरणी कामगारांचा संप, त्या संपामुळे गिरणी कामगार व त्यांच्या संपूर्ण आयुष्याची झालेली उलथापालथ याचं एक विदारक चित्र या क्राईम-थ्रिलर सिनेमारुपात आपल्यासमोर येतं. 

मुंबईच्या चाळीतील दोन अल्पवयीन मुलांच्याभोवती या ‘नाय वरनभात लोन्चा कोण नाय कोन्चा’ सिनेमाची  कथा गुंफण्यात आली आहे. दोघेही गुन्हेगारी जगतात आपलं नाव प्रस्थापित करण्यासाठीच्या प्रवासाची सुरुवात करतात. गुंड वडिलांची हत्या झाल्यानंतर दिग्या (प्रेम धर्माधिकारी ) याचं एकच ध्येय असतं ते म्हणजे वडिलांच्या मारेक-यांना यमसदनी धाडणे. त्यामुळे सुरुवातीपासूनच दिग्यामध्ये गुन्हेगारी प्रवृती असते. यात त्याला उत्तम सोबत देत असतो तो त्याचा दोस्त इलियास (वरद नागवेकर). हे दोघंही मिळून गुन्हेगारीचा मार्ग अवलंबतात आणि यातच वयात आल्याने त्यांना विविध नैसर्गिक गोष्टींची चाहूल लागते आणि मग ती जाणून घेण्यासाठीची धडपड ते सुरु करतात.

 

एकूणच हे सूडबुध्दीवर बेतलेलं कथानक असून गिरणी कामगार, त्यांच्या कुटुंबाची होरपळ, दाही दिशा दारिद्र्य असं सर्व मन  विषण्ण करणारं चित्र सिनेमात आहे. प्रेम ाणि वरद या दोघांनी आपापल्या भूमिका उत्तम वठवल्या आहेत. तसंच छाया कदम, शशांक शेंडे यांसारखे कसलेले कलाकारही आपल्या भूमिकांमधून लक्षवेधी ठरतात. तसंच कश्मिरा शहा, उमेश जगताप, रोहित हळदीकर, अश्विनी कुलकर्णी आणि गणेश यादव यांनीही आपापल्या भूमिका चोख बजावल्या आहेत. 

ब-याचदा सिनेमात एकाचवेळी अनेक घटना सुरु असल्याने एकमेकांशी त्याचंं कनेक्शन लावताना प्रेक्षकांचा गोंधळ होऊ शकतो. खरंतर हे सूडाने पेटलेलं तथानक असलं तरी यात अल्पवयीन मुलांच्या प्रश्नांनासुध्दा खुप मोठा वाव देण्यात आला आहे. वादग्रस्त दृश्यांमुळे हा सिनेमा 18 वर्षांखालील वयोगटासाठी अजिबात योग्य नाही आणि या सिनेमाच्या टॅगलाईन प्रमाणेच 18 वर्षांवरील तुमच्यात जर दम असेल तरच हा सिनेमा पाहा. 
 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive