फिल्म: द अॅक्सिडेंट्ल प्राइम मिनिस्टर
स्टारकास्ट: अनुपम खेर, अक्षय खन्ना
निर्देशक: विजय रत्नाकर गुट्टे
रेटींग : 3 मून
कथानक 'द अॅक्सिडेंट्ल प्राइम मिनिस्टर' चित्रपटाची सुरूवात 2004 मध्ये सोनिया गांधी (सुजैन बर्नेट) पंतप्रधान म्हणून डॉ. मनमोहन सिंग (अनुपम खेर) यांची निवड करतात इथून होते. पत्रकार संजय बारू (अक्षय खन्ना) मनमोहन सिंग यांचे चाहते असल्यामुळे ते त्यांचे मीडिया सल्लागार बनतात. या दरम्यान संजय बारू यांना जाणवते की मनमोहन सिंग यांना सोनिया गांधी कोणतंही निर्णय स्वातंत्र्य देत नाहीत. या दरम्यान अमेरिका व भारतामध्ये झालेल्या अणु करारामुळे मनमोहन सिंग यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. मध्यंतरानंतर पक्षाशी संबंधित अनेक भ्रष्टाचार समोर आल्याने मनमोहन सिंग सरकारला मोठ्या नामुष्कीला सामोरं जावं लागतं. संजय बारू यांच्या सल्ल्यानुसार मनमोहन सिंग निर्णय घेत असता. त्यामुळे संजय यांच्यावर राजीनामा देण्यासाठी पक्षाकडून दबाव टाकला जातो. अखेर संजय बारू राजीनामा देतात. मनमोहन सिंग यांचा पंतप्रधान पदाचा कार्यकाळ संपल्यानंतर संजय बारू द अॅक्सिडेंट्ल प्राइम मिनिस्टर पुस्तक लिहितात आणि हे पुस्तक वाचल्यानंतर मनमोहन सिंग व संजय बारू यांच्यातील नात्यात दुरावा येतो.
दिग्दर्शन दिग्दर्शक म्हणून रत्नाकर गुटे यांचा हा पहिलाच प्रयत्न असला तरी या सिनेमाच्या ब-याच बाजू त्यांनी उत्तमरित्या पेलल्या आहेत. सिनेमा पाहताना काही ठीकाणी लूपहोल्स जाणवतात. पण कलाकारांच्या दर्जेदार अभिनयात ते लपून जातात.
अभिनय या सिनेमाचा USP आहे तो म्हणजे यातील कलाकारांचा अभिनय. अनुपम खेर , अक्षय खन्ना, सुझेन बर्नेट, अहाना कुमरा, अर्जुन माथुर या कलाकारांनी त्यांच्या वाट्याला आलेली भूमिका उत्तमरित्या वठवली आहे. अनुपम खेर यांनी डॉ. मनमोहन सिंग साकारण्यासाठी घेतलेली मेहनत पडद्यावर दिसून येते.
सिनेमा का पाहावा? हा सिनेमा आपल्याला तेच दाखवतो जे आधीपासूनच माहिती आहे. डॉ. मनमोहन सिंग यांची बाजू दाखवताना त्यांच्या पक्षाला खलनायकी टच देणं यामुळे सिनेमा एककल्ली वाटू लागतो. बाकी सादरीकरण, अभिनय, संगीत या सगळ्या बाजू उत्तम आहेत. पीपिंगमूनकडून या सिनेमाला ३ मून.