Fatteshikast Review: छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याची आठवण करून देणारा सिनेमा

By  
on  

‘फत्तेशिकस्त’ या सिनेमाची घोषणा झाल्यापासून प्रेक्षकांच्या मनात सिनेमाविषयी उत्सुकता वाढली होती. यासोबतच फर्जंदनंतर दिग्पाल लांजेकर रसिकांसाठी काय घेऊन येणार याचीही उत्सुकता होती. त्यानुसार दिग्दपाल रसिकांसाठी फत्तेशिकस्त घेऊन आला आहे. 

 

 

सिनेमा: फत्तेशिकस्त 
दिग्दर्शक: दिग्पाल लांजेकर 
कलाकार: चिन्मय मांडलेकर, मृणाल कुलकर्णी, निखिल राऊत, आस्ताद काळे, तृप्ती तोरडमल, रमेश परदेशी, नक्षत्रा मेढेकर, हरीश दुधाडे, अजय पुरकर, अंकित मोहन, समीर धर्माधिकारी, मृण्मयी देशपांडे 
रेटिंग: 3 मून्स 

कथानक: 
गनिमी काव्याच्या सहाय्याने शिवाजी महाराजांनी शाहिस्तेखानावर हल्ला करून त्याची बोटं छाट्ली होती हा इतिहास आपल्या सर्वांनाच माहिती आहे. या सिनेमात त्याच गनिमी काव्याच्या थरार अनुभवता येणार आहे. या सिनेमात चिन्मय मांडलेकर शिवरायांच्या भूमिकेत आहे. तर मृणाल कुलकर्णी जिजाऊंच्या भूमिकेत दिसत आहेत. प्रेक्षकांना कथानक माहिती असूनही घटनांमधील अ‍ॅक्शन  रसिकांना भावते. तंत्रज्ञानाबाबतीतही हा सिनेमा सरस ठरतो. विशेष म्हणजे या सिनेमातील काही भागांचं शुटिंग ख-या गडावर झालं आहे. त्यामुळे त्याची परिणामकारकता वाढली आहे. 

दिग्दर्शन: 
फर्जंदचा अनुभव दिग्पालने फत्तेशिकस्तमध्ये पुरेपुर वापरला आहे. माहीत असलेल्या कथानकात रंजकता आणून ते प्रेक्षकासमोर सादर करणं हे दिग्दर्शकाचं कौशल्य असतं. दिग्पालने ते या सिनेमात पुरेपुर वापरलं आहे. कलाकारांची मांदियाळी असलेल्या या सिनेमात कथानकाचा प्रभाव कुठेही कमी न करता उत्तम मांडणी करण्यात दिग्पाल यशस्वी ठरला आहे. 

अभिनय:
कलाकारांचा अभिनय या सिनेमाचा युएसपी आहे. प्रत्येक व्यक्तिरेखेत जो तो कलाकार फिट बसला आहे. प्रत्येकाने आपल्या वाट्याला आलेली भूमिका उत्तम निभावली आहे. शाहिस्तेखानाच्या भूमिकेत असलेले अनुप सोनी यांनी देखील नकारात्मक भूमिका उत्तम साकारली आहे.

सिनेमा का पहावा? 
शिवराय हे केवळ नाव नाही तर आख्या महाराष्ट्राचं चैतन्य आहे. जाणत्या राजाचा हा पराक्रम जाणून घेण्यासाठी हा सिनेमा एकदा तरी पाहायला हवा.

Recommended

Loading...
Share