पाहा Video : जेव्हा अप्सरा सोनाली कुलकर्णी करते गायत्री दातारची नक्कल, व्हिडीओ व्हायरल 

By  
on  

सध्या लॉकडाउनमुळे सर्व चित्रीकरणही बंद आहे आणि लॉकडाउनच्या आधीच कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सर्व शुटिंग बंद करण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र ज्या मालिकांचे किंवा रिएलिटी शोचे चित्रीकरण आधीच पूर्ण झाले होते त्या सेटवरील अपडेट्स कलाकार मंडली सोशल मिडीयावर पोस्ट करत आहेत. 
नुकतच अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने युवा डान्सिंग क्वीनच्या सेटवर शुट केलेला व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओत सोनाली या शोची स्पर्धक गायत्री दातारची नक्कल करताना दिसत आहे. हा मजेशीर व्हिडीओ सध्या इन्स्टाग्रामवर चर्चेत असून त्यावर लाईक्सचा वर्षाव होत आहे. गायत्रीनेही हा व्हिडीओ पाहून त्याच्यावर हसणाऱ्या स्मायली पोस्ट केल्या आहेत. सध्या सोनालीही घरीच आहे, म्हणून सेटवरील आठवणी या निमित्ताने सोशल मिडीयावर पोस्ट करतेय. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये सोनाली म्हणते की, “गायत्री, जमलंय ना मला तुझ्यासारखं ? अर्थात तुझ्या इतका भारी नाच नाहीच जमणार” 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

बघ @gayatridatarofficial जमलंय ना मला तुझ्यासारखं अर्थात तुझ्या इतका भाऽऽऽरी नाच नाहीच जमणार आणि हो मी या video च्या शेवटी विचारलं तसं, तुम्हाला ही पाहायचं असेल की आमची गायत्री नववारी नेसल्यावर कशी चालते तर नक्की बघा #yuvadancingqueen आज रात्री ९.३० वाजता फक्त @zeeyuva वर गुढी पाडवा विशेष भाग... P.S. आम्ही या episodes चं शूटींग 24 feb ला केलंय.... so, काळजी नसावी. फक्त enjoy करा आणि हहे विचित्र हसण्याचे आवाज @aayushibhave आणि @krutikaim @nehakhanofficial यांचे आहेत. #throwback #gudipadwa #special #greenroom #vanityfair #episodes #vanity #funnyvideos #backstage.

A post shared by Sonalee Kulkarni (@sonalee18588) on

युवा डान्सिंग क्वीन या शोच्या टीमची बाँडिग खूप जबरदस्त जुळली आहे. सुत्रसंचालक, स्पर्धक, परिक्षक, कोरिओग्राफर सगळेच मिळून या शोच्या मंचावर धमाल करताना दिसले होते. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

असं म्हणतात की कुठली ही जुनी सवय मोडायला किंवा नवीन सवय करून घ्यायला २१ दिवस द्यावे लागतात आणि त्या सवयींमुळे आपली जीवनशैली घडते. चला तर मग आजपासून एक नवीन सुरूवात करूया, एका नव्या जीवनशैली कडे. या चांगल्या कामाची सुरुवात आज गुढी पाडव्याला करू. प्रशासनाच्या सर्व सूचनांचं पालन करू, सगळ्या नियमांचा आदर करू. आणि आरोग्याची गुढी उभारू गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा #gudipadwa #stayhome #stayhealthy #stayhappy #socialdistancing #indiafightscorona #gocorona #goodvibes

A post shared by Sonalee Kulkarni (@sonalee18588) on

शुटिंग बंद असल्याने घरातच बसलेले कलाकार सध्या सोशल मिडीयावरजास्तीत जास्त वेळ घालवताना दिसत आहेत.

Recommended

Loading...
Share