कोरोनाशी लढा देणाऱ्या वॉरियर्सना रोहन एन्ड रोहनचं ‘अटके है’ गाणं

By  
on  

लॉकाडाउनच्या काळात घरात बसूनही कला जोपासता येते ती इतरांपर्यंत पोहोचवता येते याची विविध उदाहरणं सध्या पाहायला मिळत आहेत. यातच सोशल मिडीयावर कलाकार, गायक, वादक यांनी तयार केलेले व्हिडीओ प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत. 

रोहन एन्ड रोहन या म्युझिकल जोडीनेही एक गाणं तयार केलं आहे.. ‘अटके है..’ असे या गाण्याचे बोल आहेत. लॉकडाउनमध्ये आपण सगळेच घरात कसे अडकलो आहोत हे या व्हिडीओत रंजक पद्धतिने दाखवण्यात आलय. रोहन गोखले आणि रोहन प्रधान यांनी हे गाणं लिहीलं आहे. त्यांनीच हे गाणं गायलं असून याला म्युझीकही दिलय.

घरात बसूनच हे गाणं तयार करण्यात आलय. शिवाय या गाण्याच्या व्हिडीओमध्ये रोहन एन्ड रोहन सोबतच इतर काही कालाकारही पाहायला मिळत आहेत. तब्बल 21 कलाकार या व्हिडीओमध्ये झळकत आहेत. कोरोनाशी लढा देणाऱ्या वॉरियर्सना हे गाणं ट्रीब्यूट म्हणून करण्यात आलय.
 

Recommended

Loading...
Share