हा गंध आपल्या मातीचा म्हणत...ही अभिनेत्री करतेय बळीराजाच्या कष्टांना सलाम

By  
on  

शेतकरी म्हटलं की अहोरात्र शेतात राबणारे कष्टकरी आणि आपल्या सर्वांचे अन्नदाता डोळ्यासमोर येतात. शेतकरी दिवस रात्र राबून शेतात पिक घेतात, त्या पिकांनासुध्दा जीव लावतात.म्हणूनच त्याला जगाचा पोशिंदा म्हणतात. तो आहे म्हणून आपण रोज दोन घास खाऊ शकतो. याच बळीराजाच्या कार्याला सलाम ठोकणारे काही फोटो स्वराज्यरक्षक संभाजी फेम अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडने तिच्या सोशल मिडीया अकाऊंटच्या माध्यमातून शेअर केले आहेत. 

 

अनेक सेलिब्रिटी विविध ट्रेण्डींग आणि फॅशनेबल फोटोशूट करुन निर्माते -दिग्दर्शकांचं व साहजिकच चाहत्यांचंसुध्दा मन जिंकण्याचा प्रयत्न करतात. पण प्राजक्ताने मात्र  या हटके फोटोशूटमधून ,सर्वांचंच लक्षवेधून घेतलं आहे. 

Recommended

Loading...
Share