अमृता खानविलकरने तिच्या 'फन मलई'ला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, पाहा Photo

By  
on  

वंदना गुप्ते या मराठी सिनेसृष्टीतल्या ज्येष्ठ अभिनेत्री. तरीही काळानुरुप त्या प्रत्येक पिढीला आपल्यात सामावून घेतात. त्यांना नेहमीच अभिनयाची चांगली शिकवण देतात. खेळीमेळीच्या वातावरणात काम आणि धम्माल अशा दुहेरी मेळ साधणा-या वंदना गुप्ते प्रेक्षकांप्रमाणे सहकलाकारांच्यासुध्दा लाडक्या आहेत. 

आज १६ जुलै  वंदना ताईंचा वाढदिवस. त्यांच्या वाढदिवसानिमित्त मराठीतील बोल्ड आणि ग्लॅमरस अभिनेत्री अमृता खानविलकर हिने दोघींचा एक गोड फोटो शेअर करत खास अंदाजात वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

#happybirthday #vandutai .... you are fabulous, amazing, beautiful and a fun MALAI Love you

A post shared by Amruta Khanvilkar (@amrutakhanvilkar) on

 

अमृता खानविलकर आणि वंदना गुप्ते या लवकरच वेल डन बेबी या आगामी धम्माल कॉमेडी ड्रामामध्ये एकत्र झळकतायत. दोघींची सिनेमात ऑन-स्क्रीन केमिस्ट्री पाहण्याची सर्वांना उत्सुकता लागून राहिली आहे.  

Recommended

Loading...
Share