दिग्दर्शक: महेश मांजरेकर
कलाकार: सागर देशमुख इरावती हर्षे,विजय केंकरे,शुभांगी दामले, सक्षम कुलकर्णी
वेळ: 2१ तास ५४ मिनिटे
रेटींग : 3.5 मून
भाई अर्थात पु. ल. देशपांडे हे मराठी जनांचं चैतन्य आहे आणि ते का आहे याचं उत्तर भाई :व्यक्ती कि वल्लीचा उत्तरार्ध पाहताना मिळतं. भाईच्या व्यक्तीपासून ते व्यक्तिमत्त्व होण्यापर्यंतची स्थित्यंतरं प्रेक्षक म्हणून पाहताना सुखावल्यासारखं वाटतं.य सिनेमाचा पुर्वार्धापेक्षा उत्तरार्ध अधिक खुलला आहे यात शंका नाही. पण याचं सगळं क्रेडिट भाई नावाच्या अजब रसायनाला आहे हेच खरं!
कथानक उत्तरार्धात घटना वेगवानतेने पुढे जातात. भाईंच्या दूरदर्शनाच्या काम आणि त्यातील घुसमट, पंतप्रधान नेहरुंशी भेट हे प्रसंग वेगाने पुढे सरकतात. मग येते ती मराठी रंगभूमीवर बटाट्याची चाळ साकारण्याच्या पर्वाची सुरुवात. या दरम्यान मराठी रसिकांच्या मनात भाई या नावाची मोहोर उमटलेली असते. या काळात भाईला मिळालेली सुनीताबाईंची साथ सहजीवनाचा पैलू समोर आणते. यादरम्यान त्यांच्या आयुष्यात आलेली भक्ती बर्वे आणि आचार्य अत्रे, विजय तेंडुलकर,बाबा आमटे ते बाळासाहेब ठाकरे या व्यक्तिमत्त्वांच्या पडद्यावरील दर्शनामुळे पुर्नभेटीचा आनंद मिळाला आहे असं वाटत राहतं. भाई हे व्यक्तिमत्व अतुल्य का आहे हे उत्तरार्ध पाहिल्यावर पटतं.
दिग्दर्शन दिग्दर्शनात हा सिनेमा कुठेतरी कमी पडतो. भाई सारखं वादळ पेल्यात सामावून घेण्याचा दिग्दर्शक म्हणून महेश मांजरेकर यांचा प्रयत्न उत्तरार्धातही तोकडा पडतो. त्यामुळे अनेकदा काही प्रसंग निसटल्यासारखे वाटतात. बाकी पुर्वाधापेक्षा उत्तरार्धात भट्टी उत्तम जमली आहे यात शंका नाही.
अभिनय पुर्वाधाप्रमाणेच कलाकारांचा अभिनय दिग्दर्शनाच्या उणीवा भरून काढतो. विजयाबाई मेहता, पंडित नेहरु, भक्ती बर्वे, संजय खापरे या व्यक्तिमत्वांचं चैतन्य जसं च्या तसं उभं करण्यात करण्यात कलाकारांना यश आलं आहे. पु. लं.च्या भूमिकेत भूमिकेत सागर देशमुख, विजय केंकरे यांनी अभिनय कौशल्य दाखवलं आहे. तर इरावती हर्षे, शुभांगी दामले यांनी इरावती बाईंना साजेसा अभिनय केला आहे.
सिनेमा का पाहावा? सिनेमाचे पावणेदोन तास भाईमय होण्याचा अनुभव घ्यायचा असेल तर हा सिनेमा जरुर पाहावा. हा सिनेमा तुम्हाला पु.लंसहित इतर उत्तुंग व्यक्तिमत्त्वांची भेट तर घडवतोच याशिवाय ज्या पिढीने पु. ल. अनुभवले नाहीत त्यांना भाई जाणून घेण्याची ही उत्तम संधी आहे.