By  
on  

'सहकुटुंब सहपरिवार' या मालिकेत या अभिनेत्याने चक्क बदलला लुक, आता दिसतो असा

'सहकुटुंब सहपरिवार' या मालिकेची कथा आता वेग धरताना पाहायला मिळतेय. एकमेकांना जीव लावणारं तर कधी कधी भांडणारं या मालिकेतील कुटुंब नुकतच एका गोष्टीमुळे चकित झालं आहे. नेहमी सगळ्यांचं लक्ष वेधणारा परश्या पुन्हा चर्चेत आला आहे.

या मालिकेतील परश्याची भूमिका लोकप्रिय ठरतेय. त्याच्याभोवती फिरणारं मालिकेचं कथानक पाहणंही रंजक ठरतय. त्यातच आता परश्याने सगळ्यांनाच सरप्राईज केलय. परश्याने स्वत:ला बदललय. परश्याने त्याचा लुकच बदलून टाकला आहे. 

 

परश्याचा बदलेला लुक पाहुन सगळेच चकित झालेले पाहायला मिळतय. त्याची हटके स्टाईल आणि लुक पाहुन सगळ्यांचे डोळे दिपले आहेत. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या मालिकेच्या प्रोमोत ते पाहायला मिळतय. तेव्हा परश्या त्याच्या लुकप्रमाणे अजून काय काय बदल करतोय हे पाहणं रंजक ठरेल.

Recommended

PeepingMoon Exclusive