'आई कुठे काय करते' मालिकेत आता अनिरुद्धचं संजनासोबतच्या नात्याचं सत्य त्याच्या संपूर्ण कुटूंबासमोर आलय. यातच आता अनिरुद्धचं कुटुंबही त्याची साथ देत नाहीये. अनिरुद्धचा परिवारही आता अरुंधतीच्या बाजूने उभा आहे. हे पाहून आता अनिरुद्धने घर सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
अनिरुद्धच्या घर सोडण्याच्या निर्णयासोबत वडिलांनी त्याला मोठा धक्का दिला आहे. राहतं घर हे त्याचे वडिल अरुंधतीच्या नावावर करत असल्याचं सांगतात. शिवाय स्थावर मालमत्तेमधील काहीही अनिरुद्धला मिळणार नसल्याचही सांगतात. मात्र अनिरुद्ध चुकत असल्याचा सल्लाही त्याचे वडिल देतात.
मात्र अनिरुद्ध त्याच्या घर सोडण्याच्या निर्णयावर ठाम दिसतोय. घर सोडून तो संजनाकडे रहायला जाणार आहे. मात्र जाताना अरुंधतीला घटस्फोटाची नोटीस पाठवणार असल्याचं तो सांगतो. तेव्हा अनिरुध्द अरुंधतीला घटस्फोटाची नोटीस पाठवणार का ? अरुंधती अनिरुद्धला घटस्फोट देण्यासाठी तयार होणार का ? हे मालिकेच्या पुढील भागांमध्ये समोर येईलच.
सध्या या मालिकेत एकामागोमाग एक ट्विस्ट पाहायला मिळत आहेत. त्यातच ही मालिका मराठी टेलिव्हीजन विश्वातील लोकप्रिय मालिकाही ठरली आहे. तेव्हा प्रेक्षक या मालिकेत पुढे जाणाऱ्या कहाणीचा आनंद लुट आहेत एवढं नक्की.