By  
on  

पाहा Video : अनिरुद्धशिवाय साजरी होत आहे देशमुखांची दिवाळी

 'आई कुठे काय करते' या मालिकेत आता बऱ्याच गोष्टी बदललेल्या पाहायला मिळत आहेत. अनिरुद्धचं संजनासोबत असलेल्या नात्याविषयी देशमुख कुटुंबाला कळताच त्यांनी अरुंधतीला साथ देण्यास सुरुवात केली आहे. संपूर्ण देशमुख कुटुंब आता अरुंधतीच्या बाजूने उभं आहे.

यातच देशमुख कुटुंब दिवाळीचं सेलिब्रेशन करत आहेत. मात्र या सेलिब्रेशनमध्ये अनिरुद्ध सहभागी नाहीय.  घर सोडून संजनाकडे गेलेला अनिरुद्ध मात्र दिवाळीच्या निमित्ताने पुन्हा आपल्या घरी येतो. मात्र देशमुख कुटुंब त्याच्याशिवायच दिवाळी साजरी करत असल्याचं त्याला दिसलं. एकीकडे अरुंधती तिच्या पहिल्या कमाईतून चांदीचं लक्ष्मीचं नाणं घेते. हे पाहून अनिरुद्धचे वडिला जोरदार दिवाळी साजरी करण्याचं ठरवतात. एकीकडे ही सगळी मंडळी दिवाळी साजरी करत आहेत तर दुसरीकडे अनिरुद्ध या सगळ्यात एकटा पडलेला दिसतोय. कारण अनिरुद्धशिवायच देशमुख कुटुंब यंदाची दिवाळी साजरी करत आहेत. दरवर्षी कुटुंबासोबत दिवाळी साजरी करणारा अनिरुद्ध या गोष्टीने मात्र दुखावला गेला आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Star Pravah (@star_pravah)

 

स्वत:चं देशमुख कुटुंब अनिरुद्धच्या विरोधात गेलेलं असताना तरी अनिरुद्धला त्याची चूक लक्षात येते का हे पाहणं आता महत्त्वाचं ठरेल. 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive