By  
on  

पाहा Video : 'फुलाला सुगंध मातीचा'मध्ये कीर्ती शुभमला अशी करतेय स्वयंपाकात मदत

'फुलाला सुगंध मातीचा' या मालिकेत आता कीर्ती हळूहळू तिच्या सासरी रमू लागली असल्याचं चित्र पाहायला मिळतय. भावाने जबरदस्ती लग्न लावून दिल्यानंतर कीर्तीची शिक्षणाची, आयपीएस बनण्याची स्वप्न तुटली. मात्र आता लग्नानंतर नव्या परिवारात कीर्ती तिचं मन रमवताना दिसतेय.

यात सगळ्यात महत्त्वाचं काय तर कीर्तीला शुभमसारखा समजुतदार पति मिळाला आहे. आणि त्याच्यामुळे आता कीर्ती जेवण बनवायलाही शिकली आहे. एवढच काय तर कीर्ती आता शुभमला त्याच्या दुकानावरही मदत करतेय. म्हणूनच त्याच्या मोठ्या ऑर्डरसाठी त्याला ती मदत करतेय. या सगळ्यात कीर्ती आणि शुभमची जवळीक वाढणार का ? दोघांचं हे नातं फुलणार का हे पुढील भागात पाहायला मिळेल.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Star Pravah (@star_pravah)

 

या मालिकेत कीर्तीच्या भूमिकेत समृद्धी केळकर तर शुभमच्या भूमिकेत हर्षद अतकरी आहे. दोघांच्याही या व्यक्तिरेखा प्रेक्षकांचं लक्ष वेधत आहेत. 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive