By  
on  

पाहा Video : या मालिकेच्या सेटवर अभिनेत्रींनी असा केला डान्स, 'सवार लूँ' गाण्यावर थिरकल्या अभिनेत्री

सहकुटुंब सहपरिवार या मालिकेतील विविध ट्विस्ट प्रेक्षकांना नेहमीच चकित करत असतात. मात्र सध्या याच मालिकेतील काही अभिनेत्रींनी नेटकऱ्यांचं मनोरंजन केलय. या मालिकेतील कलाकार सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात सक्रिय आहेत. यातच प्रसिद्ध अभिनेत्री किशोरी आंबिये देखील त्यांच्या सोशल मिडीया अकाउंटवर सेटवरील मस्ती आणि विविध व्हिडीओ शेयर करत असतात. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Nandita Patkar (@mi_nandita)

असं म्हणतात की सेटवर अभिनेत्री एकत्र आल्या की त्यांचं काही पटत नाही. मात्र ही मालिका त्याला अपवाद आहे. कारण या मालिकेतील अभिनेत्रीचीं चांगलीच मैत्री पाहायला मिळते. सोशल मिडीयावर त्यांचे एकत्र व्हिडीओही चर्चेत असतात. नुकताच या मालिकेत महत्त्वाची भूमिका साकारणारी अभिनेत्री नंदीता पाटकरने एक गमतीशीर व्हिडीओ शेयर केला आहे. या व्हिडीओत या मालिकेतील अभिनेत्री पाहायला मिळत आहेत. सवार लू या गाण्यावर त्यांनी हटके व्हिडीओ तयार केला आहे. या व्हिडीओला सोशल मिडीयावर चांगलीच पसंती मिळताना दिसतेय. 

याशिवाय हे कलाकार सेटवरील मस्ती आणि विनोदी व्हिडीओ शेयर करत असतात.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive