By  
on  

'आई माझी काळुबाई' मालिकेचे होत आहेत 100 भाग पूर्ण

'आई माझी काळुबाई' ही मालिका मागील वर्षी अनेक कारणांनी चर्चेत राहिली. मालिकेचा वेगळा विषय आणि पुन्हा अभिनेत्री अलका कुबल आई काळुबाईच्या भूमिकेत असल्याने मालिकेची उत्सुकता होती. सुरुवातीपासूनच या मालिकेने प्रेक्षकांचं लक्ष वेधलं. अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडनंतर आता या मालिकेत अभिनेत्री वीणा जगताप आर्याच्या भूमिकेत दिसतेय.

तेव्हा प्रेक्षकांचं मनोरंजन करत आता ही मालिका 100 भाग पूर्ण करत आहे. अनेक अडचणींवर मात करत ही मालिका प्रेक्षकांचं अविरत मनोरंजन करत राहिली. तेव्हा 100 भाग पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने मालिकेचे कलाकार सेलिब्रेशन करतील एवढं नक्की. विविध संकटात अडकलेली आर्या आणि तिच्यावर असलेला काळुबाईचा आशिर्वाद ज्याने ती सगळ्या संकटांना सामोरं जाते. ही कहाणी हळूहळू आणखी रंजक होताना दिसत आहे. 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive