By  
on  

उचलले न मी तुला, पाहा अनिकेत-मनूचा धम्माल व्हिडीओ

प्रेमाखातर अनिकेत आणि मनूने घरच्यांपासून लपवून लग्न केलं आणि जेव्हा ते सत्य घरी सांगण्याचा प्रयत्न केला तेव्हा ते नाकारलं गेलं. तरी सुद्धा खचून न जाता अनिकेत आणि मनूच्या प्रेमकहाणीने सुंदर वळण घेतलंय. नुकताच एकमेकांच्या साथीने संसाराचा श्री गणेशा त्यांनी केला आहे. घरच्यांनी जरी मनापासून त्यांच्या लग्नाला स्वीकारलं नसलं तरी अनिकेत मनूने आशा सोडली नाहीये. त्यांना विश्वास आहे हे चित्र लवकरच बदलणार आहे.

अनिकेत साकारणारा आशय कुलकर्णी, मनू साकारणारी तन्वी मुंडले आणि समर साकारणारा अभिनेता शशांक केतकर ह्या त्रिकुटाची ऑन-स्क्रीन जेवढी अफलातून केमिस्ट्री पाहायला मिळते. त्याहून जास्त त्यांची ऑफ-स्क्रीन धम्माल सुरु असते. या कलाकारांचे अनेक बीटीएस व्हिडीओ व्हायरल होतात. आत्तासुध्दा अनिकेत फेम आशयने शेअर केलेला व्हिडीओ पाहून तुम्हाला हसू आवरता येणार नाही. 

आशयने त्याची को-स्टार मनू साकारणा-या मानसीला जिममधल्या वेट सारखं उचलून स्कॉट्स केले आहेत. हा अफलातून बीटीएस व्हिडीओ आहे. उचलले न मी तुला असं त्याने या व्हिडीओला नाव दिलं आहे. 

 

Recommended

PeepingMoon Exclusive