आता ऑनलाईन नाही तर शंतनू-शर्वरीचं होणार खरंखुरं शुभमंगल, पाहा पात्रिका

By  
on  

'शुभमंगल ऑनलाईन' ही आजच्या डिजीटल युगातल्या ऑनलाईन लग्नाची कहाणी घेऊन आपल्यासमोर आली. सुयश टिळक आणि सायली संजीव ही फ्रेश जोडी प्रेक्षकांना आवडली. शंतनू आणि शर्वरीचे व्हिडिओ कॉलवर भेटीगाठी, बोलण सुरू झालं आणि या दोघांचे हे गोड नातं ऑनलाईनच हळूहळू फुलू लागलं... यानंतर रंगलेला लॉकडाउन दरम्यानचा ऑनलाईन लग्नसोहळा आणि ऑनलाईन लग्नाची तारेवरची कसरत सर्वांनी अनुभवली. 

 

 

ही गोड जोडी आता पुन्हा एकदा लग्नाच्या बेडीत अडकण्यासाठी सज्ज झाली आहे. शंतनू शर्वरीचा व्हर्च्युअल नाही तर आता सगळ्या घरच्यांच्या उपस्थितीत खराखुरा विवाहसोहळा रंगणार आहे. उद्या शर्वरीचा मेहंदी सोहळा रंगणार आहे.

Recommended

Loading...
Share