ती परत आलीये! रोहिणीच्या डोहाळे जेवणात अनुजाचा होणार खून

By  
on  

‘ती परत आलीये’ ही छोट्या पडद्यावरची हॉरर-थ्रीलर पठडीतली मालिका प्रेक्षकांच्या खुप पसंतीस पडतेय. पहिल्या भागापासूनच या मालिकेच्या कथानकाने प्रेक्षकांना खिळवून ठेवलं आहे. निर्जन रिसॉर्टवर अडकलेल्या मित्र-मैत्रिणींच्या ग्रुपची ही गोष्ट आहे. तब्बल दहा वर्षांनी ते एकत्र आले आहेत. 

रिसॉर्टवर अडकल्यापासून या सर्व मित्र मैत्रिणींच्या आयुष्यात खूप काही घडतंय.   घरच्या मंडळींशी, कुटुंबाशी कोणाचा काहीच कॉन्टॅक्ट नाहीय. इथे फक्त आधार आहे तो एकमेकांचाच. आधी अभ्याचा खून झाला  त्या धक्क्यातून सावरले न सावरले तोच मॅण्डीचा मृतदेह स्विमींगपूलमध्ये आढळला. आता आणखी एकाचा बळी लवकरच जाणार असल्याचा प्रोमो झळकतोय.

रोहिणी गरोदर असल्यामुळे तिची काळजी सगळ्यांनाच आहे. त्यामुळे तिचं डोहाळे जेवण करण्याचं सर्वजण ठरवतात. जे आहेत दिवस एकमेकांच्या साथीने आनंदाने जगण्यासाठी दोस्तांनी हा प्लॅन बनवला. सगळेच या डोहाळे जेवणात भरपूर धम्माल करतात. नाचतात-गातात, मज्जा करतात. 
 

 

डोहाळे जेवणाचा कार्यक्रम ऐन रंगात असताना अनुजा स्वयंपाकघरात काहीतरी आणण्यासाठी जाते. तिथे तिला एक सावली दिसते. टिक्या समजून ती त्याला हाका मारत जंगलात त्या आकृती सोबत पाठीपाठी जाते आणि क्षणार्धात ती आकृती मागे वळून अनुजाच्या पोटात सुरा खुपसते. 
 

Recommended

Loading...
Share